Monday, May 12, 2025
क्राइमगोंदियागोरेगांव

2500 रू.लाच घेताना तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचा लेखापाल एसीबीच्या जाळ्यात

गोंदिया – गोरेगाव तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात लाच स्विकारताना अडकल्याची घटना आज गुरुवारला सायकांळी घडली.गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथील तक्रादाराचे प्रोत्साहन भत्ता काढून देण्याकरीता आरोपी लोकसेवक सुरेश रामकिशोर शरणागत वय 36 वर्ष ,पद – लेखापाल (कंत्राटी),तालुका नियंत्रण पथक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोरेगाव. रा. चोपा ता. गोरेगाव जि. गोंदियायानी ३००० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंति लाच मागणी रू 2500/- ची लाच स्विकारताना अटक करण्यात आली.

तक्रारदार या प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत उपकेंद्र गिधाडी ता गोरेगाव येथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. आलोसे हे तालुका नियंत्रण पथक गोरेगाव येथे कंत्राटी लेखापाल म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे 16500/- रू रकमेचा ईंसेंटीव्ह ( प्रोत्साहन भत्ता) काढून दिल्याच्या मोबदल्यात आलोसे हा 3000/- रू लाच मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती.

लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपीने 3000/- रू ईतक्या लाच रकमेची मागणी करुन तडजोडी अंती 2500/- रू लाच मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. सापळा कारवाई दरम्यान आलोसे याने पंचासमक्ष २५००/- रू लाच रक्कम स्वीकारली असता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.


. राहुल माकणीकर सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर,

. सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.

पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे

पोलीस उप अधीक्षक

ला. प्र. वि. गोंदिया

मो. क्रं 9867112185

▶️ सापळा -अधिकारी

पो. नि. उमाकांत उगले

पोलीस निरीक्षक

*▶️सापळा कार्यवाही पथक

पोनी अतुल तवाड़े, पो. नि. उमाकांत उगले.स.फौ.करपे,

पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे,कैलास काटकर अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे य़ानी ही कारवाई पार पाडली.

error: Content is protected !!