सडक अर्जुनी येथे आज जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन
सडक अर्जुनी : येथील तेजस्विनी लॉन रोड सडक अर्जुनी येथे आज दिनांक ९ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते,करण्यात येणार आहे. उद्घाटक म्हणून माजी मंत्री राजकुमार बडोले हे लाभणार आहेत. गोंडवाना गोंड समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत मडावी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष तेजराम मडावी, संस्थापक मिलिंद कुरसुंगे, एस. चंद्रा ग्रुपचे संस्थापक डॉ. अजय लांजेवार, तहसीलदार अक्षय पोयाम,सेवानिवृत्त आयुक्त धनवंत कोवे, जंगल कामगार सहकारी संस्थेचे पर्यवेक्षक मधुकर गावराने, पीएसआय मनोहर इसकापे,नगरसेवक प्राचार्य राजकुमार हेडाऊ, माजी.जि. प. समाज कल्याण सभापती राजेश नंदागवळी, संघटनेच्या जिल्हाध्यक्ष छाया ताई टेकाम, जिल्हा उपाध्यक्ष सोभीलाल उईके,भोजराज मसराम, आनंद इडपाते, पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये, सपनाताई नाईक, नगरसेविका कामिनी कोवे, पदमाताई परतेकी, संतोष धुर्वे गंगाधर कुंभरे, संजय प्रधान, डेव्हिड सयाम, लेखपाल टेकाम, प्रकाशबापू मडावी, शुभांगी वाढवे, अशोक इलपाते,सुधाकर पंधरे , प्रधान संपादक डॉ.सुशिल लाडे ,पत्रकार बिरला गणवीर,प्रा. राजकुमार भगत,आदी मान्यवर उपस्थित राहतील.
सकाळी ११ वाजता बिरसा मुंडा चौकसडक अर्जुनी येथे ध्वजारोहण, दुपारी १२:३०वाजता बिरसा मुंडा चौक तेजस्विनी पर्यंत रॅलीचे आयोजन, दुपारी २ वाजता तालुक्यातील १०वी व १२ वी मधील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्यसत्कार,तसेच राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरीकरणारे खेळाडू व समाजातील मान्यवरांच्यासत्कार, दु. २.३० वाजता समाज प्रबोधनमार्गदर्शन कार्यक्रम, सायं. ५ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी समाजातील विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.