Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

काँग्रेस सेवा दल कमिटी नी पाठविले महामहीम राष्ट्रपतींना पत्र

सडक अर्जुनी – गोंदिया सडक अर्जुनी तालुका सेवादल काँग्रेस कमिटीने माननीय तहसीलदार सडक अर्जुनी यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना मंत्रिमंडळातून निलंबित करा अशाप्ररच्या मागणीचे पत्र पाठविले. ओबीसींची जाती निहाय जनगणना व्हावी अशी मागणी संसद भवनात विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी यांनी केली असता, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांची जात विचारली म्हणून त्यांच्या निषेध केला व मंत्रिमंडळातून निलंबित करण्यात यावे,विरोधात सडक अर्जुनी काँग्रेस सेवा दल कमिटीच्या वतीने त्यांच्या विरोधात महामयम राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष काँग्रेस सेवा दल संतोष लाडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे,काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, तालुकाध्यक्ष शंकर भाऊ मेंढे परिवहन विभाग, विधानसभा समन्वय प्रमोद पाऊलझगडे, डॉक्टर अजय लांजेवार, निशांत राऊत, अनिल मेश्राम गुरुजी, साहेबराव पंचभाई, शहराध्यक्ष वीरू गौर, रवींद्र खोटोले, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते माननीय तहसीलदार यांना निवेदन देताना हजर होते.

error: Content is protected !!