विरू गौर यांची सडक अर्जुनी काँग्रेस च्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती
सडक अर्जुनी – निलेश शहारे – तालुक्यातील सडक अर्जुनी येथील रहिवाशी विरू गौर यांची भारतीय राष्ट्रीय कांग्रेस च्या शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे . याबाबत जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दिलीप बन्सोड यांच्या सहीने नियुक्तीपत्र यांच्या हस्ते देण्यात आले.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष मधुसुदनजी दोनोडे, प्रदेश कांग्रेस चे महासचिव दामुभाऊ नेवारे ,जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले ,युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष निशांत राऊत,मा. अजयजी लांजेवार,किशोरजी शेंडे,महिला शहर अध्यक्ष धनवंता गभणे,मालती राजगिरे, दिनेशजी हुकरे,भोजराजजी मसराम, नशिमभाई शेख ,नासिरभाई शेख,शाहिदभाई सेख ,रेहान शेख,ओवेश चिस्ती,निखिल कोटांगले,प्रदीपजी यावलकर,ताराचंद मालदे,अनिलजी मेश्राम सर ,अनिल मेश्राम,चंद्रकुमार गणवीर,साहेबराव पंचभाई, संजय प्रधान,विनोद पुसाम,शंकर मेंढे,अमन यावलकर आणि इतर काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुक्यात कांग्रेस भक्कम व मजबुत करणे पक्षाचे विचार घरोघरी पोहचविने या कामासाठी विरू गौर यांची शहर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. विरू गौर शालेय जीवनापासूनच समाज कार्यात अग्रेसर आहेत. काँग्रेस मध्ये कित्येक वर्षापासून कार्य करीत आहेत. त्यांच्या कामाची पावति म्हणून शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विरू गौर यांची सडक अर्जुनी शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.