अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई साठी गृहमंत्र्यांना दिले निवेदन
सडक अर्जुनी – नागभीड तालुक्यातील, वाढोना गावातील शालेय विद्यार्थिनीवर, तिच्याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग व अत्याचार केल्याची घटना ९/८/२४ लक्षात येताच कुटुंबाने तक्रार दाखल करताच आरोपी रुपेश डोरलीकर याला अटक करण्यात आली असुन सदर आरोपीस कठोर शिक्षा होण्यासाठी कोहळी समाज संघटना सडक अर्जुनी गोंदिया चे वतीने अक्षय पोयाम तहसीलदार सडक अर्जुनी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री .मा. देवेंद्रजी फडणवीसयांना आरोपी शिक्षक याला कठोर शिक्षा व्हावी व सोबतच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी या करीता निवेदन देण्यात आले.व या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
निवेदन देतेवेळी गंगाधर परशुरामकर माजी जिल्हा परिषद सदस्य , किशोर डोंगरवार जिल्हाध्यक्ष कोहळी समाज कर्मचारी संघटन जिल्हा गोंदिया, ललित (पिंटू) डोंगरवार कॉन्ट्रॅक्टर , प्रविण गहाने सरपंच , वंदना किशोर डोंगरवार उपनगराध्यक्ष , किरण हटवार सरपंच, लता गहाने सरपंच, कुंदा काशीवार सरपंच , राजू कापगते, जी आर गायकवाड केंद्रप्रमुख , घनश्याम कापगते केंद्र प्रमुख, योगेश मुंगुलमारे केंद्र प्रमुख, एम एम परशुरामकर, डी पी पर्वते, प्रकाश काशिवांर , डी पी डोंगरवार, ओमेश कापगते कॉन्ट्रॅक्टर , दुर्वास कापगते, गुड्डू डोंगरवार, दिनेश कापगते, लंजे साहेब, योगेश कापगते, अशोक कापगते, छगन परशुरामकर, आश्विन लोधी, राजेश पुस्तोडे, परशुरामकर व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
आरोपीस कठोर शिक्षा द्या
किशोर डोंगरवार
“शालेय अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा अमानवीय असुन विकृत मानसिकतेचा प्रतीक आहे, सदर व्यक्तीस पोस्को कायद्यानतर्गत अटक जरी झाली असली तरी भविष्यात अश्या घटना घडू नये यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कुटुंबास लवकर न्याय द्यावा अशी मागणी कोहळी समाज कर्मचारी संघटन जिल्हा गोंदिया चे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी केली आहे”