वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल आणि शिकाल तर टिकाल:-इंजि यशवंत गणविर
अर्जुनी मोरगाव – दिनांक १८/०८/२०२४ रोज रविवार ला मौजा कान्होली येथे दर्शन सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण सोहळा पार पडला.या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि यशवंत गणविर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटले की,वाचन हे मानवी जीवनातील अमृत आहे,कारण वाचनामुळे मानव शिक्षित, सुशिक्षित, सृजनशील व सुसंस्कृत बनतो.हि तादक वाचनामधे आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आजचे युग हे स्पर्धेचे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या स्पर्धेत टिकायचे असेल तर वाचन हा महत्त्वाचा घटक आहे.कारण वाचनामुळे मानवी जीवनमान बदलते,मानवी जीवनात वाचनामुळे परीवर्तन घडुन येते.आज आपल्या गावातील नवतरुण मंडळींनी वाचनालयात येऊन वाचन केले व आपली बौद्धिक प्रगती करुन आज ते शासकीय सेवेत रुजू झाले.त्यांनी आपली प्रगती घडवुन आणली मग मी का नाही आपली प्रगती करु शकत अशी जिद्द चिकाटी आपल्या उराशी बाळगून ध्येय गाठावे.
उदाहरण द्यायचे झाले तर भारत देशाचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम साहेब यांचे वडील बंगालच्या उपसागरात मासेमारी करायचे,घरची परिस्थिती हलाखीची असताना स्वतः पेपर वाटुन त्यांनी ध्येय व चिकाटीने लक्ष गाठले व आज ते भारतातीलच नाही तर जगातील एक नामवंत वैज्ञानिक झाले.म्हणुनच वाचाल तर वाचाल, वाचाल तर शिकाल व शिकाल तर टिकाल म्हणून आपण नित्य नियमाने वाचन करावे,कारण वाचनामुळे अनुभव येतो आणि अनुभवातून आपण शिकतो.म्हणुन सर्व नवतरुण, विद्यार्थी मित्रांनी वाचनाचा छंद जोपासावा असे आवाहन विचारमंचावरून केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते,माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली, सरपंच छाया अमले, जिल्हा परिषद सदस्य लायकराम भेंडारकर,माजी सरपंच संजय खरवडे, पोलिस निरीक्षक अशोक खेडकर, पोलिस उपनिरीक्षक घनश्याम थेर, राजहंस ढोके, लक्ष्मीकांत धानगाये, ग्रामपंचायत सदस्य गोविंदा मळकाम, कविता काटेंगे,हेमलता गावळ,कल्पना राखडे,विरेखा वलके, योगेश काटेंगे, महेंद्र रहिले, अविनाश रहिले व गावातील नागरिक व बालगोपाल उपस्थित होते.