सडक अर्जुनी नगर पंचायत चे मुख्याधिकारी आता सारंग खांडेकर
सडक अर्जुनी : राज्यातील नगर पालिका,परिषद तथा नगर पंचायतीमध्ये मुख्याधिकारी पदावर प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी पदी नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नगर विकास उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी करून मंत्रालयाच्या संबंधितांना त्वरित रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.
यात जिल्ह्यातील सडक अर्जुनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी म्हणून सारंग खांडेकर व सालेकसा गरपंचायत मुख्याधिकारीपदी प्रमोद कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नगरपंचायतींची मुख्याधिकाऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपली.