Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी तील दोन युवकांचा चुलबंद जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्यात अपघाती निधन 

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी तील दोन युवकांचा चुलबंद जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्यात अपघाती निधन झाले. भारत बंद असताना सडक अर्जुनी सुध्दा पूर्णतः बंद पाळण्यात आली. त्या अनुसंघाने सहलीला गेले असता हा अपघात झाला. सविस्तर असे की, गोरेगाव येथील पोलिस ठाण्याअंतर्गत चुलबंद जलाशयाचे अतिरिक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्यात २१ ऑगस्टच्या सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. कादीर मतीन शेख (२८), कैफ अमीन शेख (२१) दोघेही रा. सडक अर्जुनी) अशी मृतांची नावे आहेत.

भारत बंद असल्याने कादीर मतीन शेख व कैफ अमीन शेख हे चुलबंद जलाशय येथे सहलीकरिता आल होते. चुलबंद जलाशयाचे अतिरीक्त पाणी वाहून जाणाऱ्या कालव्याजवळ

असतानाच एकाचा तोल धबधब्यात गेला. त्यात मोठा डोह असल्याने त्यात बुडत असताना दुसरा वाचविण्यासाठी धावला. पण यात दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही बातमी वाऱ्यासारखी मुरदोली गावात पसरली. नागरिकांनी या धबधब्याकडे धाव घेतली. धबधब्यात डोह असल्याने ही माहिती पोलिस पाटील दिलीप मेश्राम वनपरिक्षेत्र अधिकारी यांना देण्यात आली.

पोलिस पाटील मेश्राम यांनी गोरेगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन नागरिकांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढले. दरम्यान उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबाच्या स्वाधिनकरण्यात आले.

तक्रारीवरून फिर्यादी रशिद मतीन शेख वय २६ वर्ष रा. सडक अर्जुनी, याचे रिपोर्टवरून पोस्टे डुग्गीपार येथे मृत्यु. क. ४४/२०२४ कलम १९४ भा.ना.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर घटनेचा तपास पो.ह.वा. इस्कापे / ४८८ पो.स्टे. डुग्गीपार हे करीत आहेत.

या घटनेने मात्र सडक अर्जुनीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!