Tuesday, May 13, 2025
क्राइमसड़क अर्जुनी

वण विभागाचे कर्मचारी अडकले एसीबी च्या जाळ्यात 

सडक अर्जुनी – तक्रारदार हे  रा. भोंडकीटोला (दल्ली) ता.सडक अर्जुनी , जि.गोंदिया येथील असून

आरोपी लोकसेवक :-    १) श्री.तुलसीदास प्रभुदास चौव्हाण वय 34वर्ष , पद -वनरक्षक , क्षेत्र सहायक रेंगेपार अंतर्गत दल्ली बीट. ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया रा. सडक अर्जुनी

2) देवानंद चपटू कोजबे वय 58 वर्ष, धंदा वनमजुर नेमणूक दल्ली बीट रा. खजरी डोंगरगाव ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया.  17/9/2024 तक्रार प्राप्त झाली.तक्रारीची पडताळणी दि.19/09/2024 झाली असून    सापळा कार्यवाही दि. 20/09/2024 रोजी झाली. लाच मागणी रु.20000/- तडजोडीअंति लाच मागणी रू 10,000/- लाच स्विकारली – रू 5000/- (पहिला हप्ता.)  घटनास्थळ- दल्ली गावा जवळील जंगल परिसरात झाली.

सविस्तर वृत्त असे की, यातील तक्रारदार यांची शेती दल्ली शिवारात वन जमीन लगत असून दोन आठवड्यापुर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वन जमिनीतील झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरीता जमीन साफसूफ केली होती. दिनांक 13 /09/ 24 रोजी आलोसे क्रं. 1 याने तक्रारदार यांना फोन करून सडक अर्जुनी येथे बोलावून त्यांना शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व त्यानंतर आरोपी क्रमांक एक याने शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबाबत कारवाई न करण्याकरता तक्रारदाराकडे वीस हजार रुपये रकमेची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदाराने ला. प्र. वि. गोंदिया येथे तक्रार दिली होती .

लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक एक याने पंचासमक्ष वीस हजार रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती दहा हजार रुपये लाच रक्कमेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली .

सापळा कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक एक याच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक दोन याने लाच रकमेतील पहिला लाचेचा पहिला हप्ता रुपये 5000 तक्रारदाराकडून स्वीकारला. दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन डुग्गीपार जि. गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.

—-+—–

मार्गदर्शन :  श्री. डॉ.दिगंबर प्रधान सर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर,

श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र.

श्री संजय पुरंदरे,अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. गोंदियामो. क्रं 9867112185सापळा -अधिकारी पो. नि. राजीव कर्मलवार*पोलीस निरीक्षकसापळा कार्यवाही पथकविलास काळे पोलीस उप अधीक्षक,पोनी राजीव कर्मलवार, पो. नि. उमाकांत उगलेस.फौ.करपे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे

हॅश वैल्यू घेण्यात आली आहे.

=============

गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील नंबरशी संपर्क साधावा.

1) मा.श्री.डाॅ.दिगंबर प्रधान सर, पोलिस अधीक्षक ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र, नागपूर.मो.नं.9923185566    2) विलास काळे पोलीस उप अधीक्षक,ला. प्र.वि .गोंदिया  मो. नं.9867112185

राजीव कर्मलवार,पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. गोंदियामो. क्र.9021452760 पो. नि. उमाकांत उगले 9664959090ला. प्र. वि. गोंदिया  दुरध्वनी 07182251203 @ टोल फ्रि क्रं. 1064

error: Content is protected !!