विधानसभा निवडणुका जवळ येताच उमेदवाराच्या दौऱ्याला आला वेग.!
सडक अर्जुनी ( डॉ.सुशिल लाडे) – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. उमेदवारांपेक्षा जनताच निवडणुकांच्या चर्चा पानटप्र्यांत करताना दिसत असल्याचे चित्र आहे. राज्यातील राजकारण्यांप्रमाणे राज्यातील जनतेलाही निवडणुकांचे वेध लागले आहेत.
अर्जुनी मोर विधानसभा ६३ मध्ये सध्याचे निवडणुकीचे चित्र बघता निवडणुकीचा वातावरण तापला असताना दिसतो. इच्छुक उमेदवार रणसंग्रामात उतरण्याची पूर्ण तयारीला लागले आहेत. राज्यात महायुती आणि महाविकाश आघाडी असल्या मुळे तिकीट वाटप कार्यक्रमाची प्रतीक्षा उमेदवारां बरोबर जनतेलाही आहे.
अर्जुनी मोर विधानसभेचे चित्र बघता महायुती मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ,शिवसेना (शिंदे गट) आणि महविकास आघाडी मध्ये काँग्रेस, शिवसेना ( उ.बा.ठा.),राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) आहे.
महायुती आणि महाविकाश आघाडी मधील इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणत असल्याचे दिसून येते. जागा वाटपाचा कार्यक्रम निश्चित झाला नसला तरी विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे दुसऱ्यांदा ह्याट्रिक मारण्याचा पूर्ण तयारीला लागले आहेत यात काही शंका नाही.
सांगायचे म्हणजे सध्या महा युती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार) गटाचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे आहेत. गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी चे कद्दावर नेते प्रफुल पटेल यांचा गृह जिल्हा म्हणून संपूर्ण देशात ओळख आहे हे विशेष.
तर दुसरी कडे महायुती मध्येच असलेले भाजप चे नेते एकदा २००९ मध्ये आमदार आणि २०१४ मध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले इंजि. राजकुमार बडोले यांनी सुद्धा संपूर्ण विधानसभा क्षेत्र पिंजून काढला आहे. आणि सतत पाच वर्षा पासून जनसंपर्क आणखी मजबूत केला असल्याचे चित्र विधानसभा क्षेत्रात दिसत आहे. लोकप्रियते मध्ये राजकुमार बडोले यांची पसंती मोठी आहे असे जनमानसात चर्चा होताना दिसते तसेच भाजप चे रत्नदीप दहिवले सुद्धा उमेदवारी साठी शर्यतीत असल्याचे चित्र दिसत आहे.
विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे विकासकामे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत यात काही शंका नाही असेही नागरिक सांगत असतात. मुख्य म्हणजे यात आता महा युती चे पक्ष श्रेष्ठी नेते मंडळी अर्जुनी मोर विधानसभा साठी काय निर्णय घेतात यात सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संगायचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा) मध्येच इच्छुक उमेदवार म्हणून डॉ. सुगत चंद्रिकापुरे, जी.प. उपाध्यक्ष इंजि. येसवंत गणवीर, युथ आयकॉन म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली असलेले नगरसेवक दानेश साखरे, हे सुध्दा शर्यतीत आहेत.
तर महा विकास आघाडी मध्ये असलेले काँग्रेस पक्षा कडून १८ पेक्षा जास्त उमेदवार असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस चे इच्छुक उमेदवार हे आपले बूथ बैठका घेत आहेत.
आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून एकमेव नाव जास्त प्रमाणत चर्चा होताना दिसते तो म्हणजे मिथुन मेश्राम यांचे आहे. महा विकास आघाडी चे सुद्धा तिकीट वाटप कार्यक्रम निश्चित न झाल्यामुळे सर्वांना प्रतीक्षा आहे. मात्र महा विकास आघाडी चे ईच्छुक उमेदवार जय्यत तयारीला लागले असून आपले जन संपर्क वाढवून मतदारांपर्यंत घरो घरी जात आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबरपासून केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम चार दिवस महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयोगाची टीम विधानसभा निवडणुकीबाबत माहिती घेणार आहे. तसेच राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला आहे. येत्या 26, 27 आणि 28 सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. येत्या गुरुवारी 26 सप्टेंबरला केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईत येतील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 27 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता सर्व राजकीय पक्षांसोबत बैठक होईल. यानंतर त्याच दिवशी दुपारी 1 वाजता सीईओ, नोडल अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल. यापाठोपाठ दुपारी 3 वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी, आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा, सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक होईल. तसेच शुक्रवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी महत्त्वाच्या बैठका होतील. या सर्व बैठकींमध्ये राज्याची सध्याची परिस्थिती आणि विधानसभा निवडणूक याबद्दलचा आढावा घेतला जाईल.
विशेष म्हणजे येत्या ॲाक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रा बरोबर झारखंड विधानसभेची निवडणूक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.