गोंदिया वन विभागांतर्गत अर्जुनी/मोरगांव वन परिक्षेत्रात वन्यप्राणी बिबटचा मृत्यू
अर्जुनी मोर – गोंदिया वनविभागातील अर्जुनी/मोर, वनपरिक्षेत्रांतर्गत सहवनक्षेत्र बोंडगांव नियतक्षेत्र बोदरा मधील गट नं. 70/ 1 येथे शेता लगत दिनांक 01/10/20244 रोजी सकाळी 11.00 ते 11.30 वाजताचे दरम्यान वन्यप्राणी बिबट मृत अवस्थेत पडुन असल्याचे गस्ती दरम्यान वनकर्मचा-यांना आढळून आले. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच अर्जुनी/मोरगांव वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक हे डॉ. उज्वल बावनथडे, पशुधन विकास अधिकारी, अर्जुनी/मोर. यांचेसह मौक्यावर उपस्थित होवून मौका स्थळी मृत वन्यप्राणी बिबटची पाहणी केली असता, मृत बिबटचे शरीरावर मानेवर, मागील पयावर, पोटावर दातांचे निशान आढळून आले.
तसेच मृत बिबटचे समोरील एक पाय पुर्णपणे मोडलेल्या अवस्थेत आढळून आले. तसेच घटना स्थळी चिखलामध्ये रुतलेले वाघाच्या पंज्याचे निशान आढळून आले यावरुन सदर बिबटयाचा मृत्यू हा वाघाच्या हल्ल्यात झाल्या चा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटने बाबत माहिती प्राप्त होताच प्रमोदकुमार पंचभाई, उपवनसंरक्षक गोंदिया, अविनाश मेश्राम, प्रकाष्ठनिष्कासन अधिकारी, नवेगांवबांध, एस. जी. अवगान, वनपरिक्षेत्र आधिकारी अर्जुनी/मोर (अ.का), मुकुंद धुर्वे, मानदवन्यजीव रक्षक, गोंदिया तसेच अर्जुनी/मोर. येथेल प्रतिष्ठीत नागरीक यांनी घटना स्थळी भेट देवून डॉ. उज्वल बावनथडे,पशुधन विकास अधिकारी, अर्जुनी/मोर. यांचे उपस्थितीत मृत बिबटच्या शवाची तपासणी करण्यात आली.
व सदर मृत बिबटच्या मृत देहास अर्जुनी/मोर जलावू लाकूड आगार येथे हलविण्यात येवून सदर ठिकाणी पशुधन विकास अधिकारी,अर्जुनी/मोर यांचे कडुन मृत बिबटचे शव विच्छेदन करण्यात आले व मृत बिबटच्या अवयवाचे नमुने सिलबंद करुन सर्व वनअधिकारी व कर्मचारी यांचे उपस्थित मृत बिबटचे शव जाळून नष्ट करण्यात आले. सदर बिबट वन्यप्राण्याचे मृत्यू प्रकरणी वनगुन्हा जारी करण्यात आलेला असून, उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी, नवेगांव बांध हे पुढील तपास करीत आहेत.