Tuesday, May 13, 2025
सड़क अर्जुनी

म्हसवाणी येथे युवा रुरल असोसिएशन कडून स्वच्छता पंधरवडा दिन साजरा 

सडक अर्जुनी – आज दिनांक ०९.१०.२०२४ रोजी मौजे म्हसवानी येथे महात्मा गांधी जयंती निमित्त बी. आर. एल. एफ. व वाय. आर. ए. यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत म्हसवाणी येथे स्वच्छता पंधरवडा दिवस हा १आक्टोंबर ते १५ आक्टोंबर पर्यंत साजरा करण्यात येत आहे आहेत. या कार्यक्रमाकरिता युवा रूरल असोसिएशन , सडक अर्जुनी यांनी गावांमध्ये विविध उपक्रम साजरे केले त्यामध्ये सकाळी प्रभात फेरी , गाव, रस्ते, चौक, स्वच्छता , वैयक्तिक स्वच्छता ( हात धुणे) चित्रकला स्पर्धा, ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी वर्ग यांच्यामार्फत विकास बैठकीचे आयोजन, वृक्षारोपण, इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रविकांत सानप साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती सडक अर्जुनी, आरती धुळे मॅडम, लेखापाल पंचायत समिती, अध्यक्षस्थानी श्री माननीय श्री चेतनजी वडगाये, उपाध्यक्ष माननीय श्री प्रकाशजी रहांगडाले सरपंच ग्रामपंचायत म्हसवानी, श्री नाकाडे सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद , मा. श्री . आनंद सूर्यवंशी सर टीम लीडर युवा रुरल असोसिएशन, श्री. ओ. एन. कापगते , ग्राम. अधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष राधेलाल गौतम ,निलेश शेंडे पोलीस पाटील , युवराज मानकर रोजगार सेवक, आशा वर्कर रूपालीताई मोहुर्ले, ग्राम. शिपाई बापुदास मोहुर्ले, कम्प्युटर ऑपरेटर विलास शेंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री आनंद सूर्यवंशी सर यांनी केले यामध्ये गावांमध्ये अति प्रभाव मेघा पाणलोट प्रकल्पाबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली , शेती, माती, जन ,जंगल ,जमीन अशा विविध प्रमुख विषयांना असा विकास करणे व प्रत्येक हाताला काम शेतीला पाणी व कुटुंबाची उत्पन्न दुप्पट करणे याबाबतचे ध्येय प्रकल्पाचे असल्याबाबतची माहिती दिली. लोक सहभागीय मूल्यांकन, शिवार फेरी, सर्वेक्षण करणे, शेतशिवारातील कामे चे सर्वेक्षण करणे, अशा 56 गावांच्या कामे (डीपीआर) प्रकल्प सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे व ग्रामपंचायत स्तरावर मंजुरी घेत असल्या बाबतचे सांगितले.

प्रमुख पाहुणे रविकांत सानप साहेब यांनी गावच्या विकासामध्ये स्वच्छता , आरोग्य, पर्यावरण या बाबींचा खूप मोठा सहभाग आहे आणि प्रशासकीय स्तरावरून ग्राम पंचायतीना योजनेचा लाभ देण्यासाठी प्रशासन तत्पर असून प्रकल्पाच्या कामासाठी सदैव सहकार्य करणार असल्याचे सांगितले. स्वच्छता पंधरवाडा या कार्यकर्माचे माध्यमातून बालकांचे मानसिक विकास करण्याचा उद्देशाने शाळेमध्ये स्वच्छता , चित्रकला , हात धुणे , अशा उपक्रमातून विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.

स्वच्छता पंधरवडा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाय आर ए टीम यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!