शेतकरी युवक यांचे प्रश्न सुटणे गरजेचे:- मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष
अर्जुनी मोरगाव – (प्रतिनिधी)- गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. ईथे तरुणांच्या हाताला काम नाही युवकांना राज्य बाहेर जाऊन काम करावे लागते. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवण्यापेक्षा अर्जुनी मोरगाव च्या एम.आय.डी.सी मध्ये उद्योग आणावे.परंतु ईथल्या आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी कधी उद्योग धंदे क्षेत्रात यावे म्हणून विधानभवनात प्रश्न उपस्थित केला नाही. जेणे करून शेतकरी युवक यांचे प्रश्न मार्गी लागतील यासाठी कधी प्रयत्न केले नाही. असे प्रतिपादन मिथुन मेश्राम जिल्हा कार्याध्यक्ष यांनी केले.
महागाव येथे नवरात्र उत्सव निमित्ताने आयोजित नशिब या नाटकाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत परशुरामकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव हे होते. प्रामुख्याने उपस्थित जयश्री देशमुख जिल्हा परिषद सदस्य, अनिल दहिवले, यशवंत खोब्रागडे, दिनेश पंचभाई, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना मिथुन मेश्राम म्हणाले की, महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. सरकार ने शेतकऱ्यांचे विद्युत बिल माफ केल्याची घोषणा केली परंतु अजुन पर्यंत शेतकऱ्यांचे बिल झिरो झाले नाही. ज्या शेतकऱ्यांनी शेतीचे विज बील भरले त्यांची रक्कम सरकारने परत करावी. गोंदिया जिल्ह्यात धानावर आधारित प्रक्रिया उद्योग नसल्याने धानाला पाहिजे तो भाव मिळत नाही. शेतकरी व युवक हवाल दिल झाले आहेत. परंतु इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी कधी त्यांचा समस्यांकडे लक्ष दिले नाही.