अंदाजे 3 कोटी 91 लाख किंमतीचे सोने जप्त
गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता निवडणूक घोषित झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागु होताच गोंदिया जिल्ह्यातील 66-आमगाव विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी FST आणि SST पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी सदर मतदार संघातील आमगाव तालुक्यात कार्यरत FST आणि SST पथक यांनी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत आमगाव- लांजी बॉर्डर येथून वाहन क्रमांक सीजी04 एन2876 मधून 7892 ग्रॅम अंदाजे 3 कोटी 91 लाख किंमतीचे सोने जप्त करण्यात आले. तहसिलदार आमगाव आणि ठाणेदार पोलीस स्टेशन आमगाव यांचे निगराणीत जप्त मुद्देमाल सीलबंद करुन पोलीस संरक्षणात जिल्हा कोषागार कार्यालय गोंदिया यांचे अभिरक्षेतील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आला आहे.
सदर कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शनात करण्यात आली. सदर कार्यवाहीची नोंद ESMS ॲपमध्ये घेऊन मुद्देमालाची तपासणी करुन पुढील कारवाई भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार करण्यात येईल. असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड यांनी कळविले आहे