अजितदादांच्या NCP ची पहिली यादी आली समोर
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आज पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने रविवारी पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता अजित पवारांच्या पक्षानेही पहिली यादी जाहीर करत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पहिल्या यादीत अजित पवारांनी 38 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.