Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा उमेदवार बदलण्यात यावा-पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांची मागणी

सडक अर्जुनी –63 अर्जुनी मोर अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याबाबत 27 ऑक्टोबर 2024 ला पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली यावेळी राजेश नंदागवळी,अनिल दहिवले,निशांत राऊत, प्रदीप गणवीर,नूतनताई दहिवले,डॉ.अजय लांजेवार,अतुल बनसोड सूर्यकांत डोंगरे,विजय खोब्रागडे,रवींद्र पंचभाई हरीश बनसोड या शर्यतीत असलेल्या उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली.

पत्रकार परिषदेत बोलताना 63 अर्जुनी मोरगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणुकी करिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जो उमेदवार जाहीर करण्यात आला त्या संदर्भात सन्माननीय नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांना काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्ताकडून विनंती करण्यात आली व अर्जुनी मोरगाव क्षेत्रातील स्थानिक उमेदवाराला संधी देण्यात यावी याकरिता पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये दिनांक 8 सप्टेंबर रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशअध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच खासदार प्रशांत भाऊ पडोळे यांना निवेदन देऊन विनंती केली होती की अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राकरिता उमेदवारी देताना स्थानिक उमेदवारांना उमेदवारी द्यावी परंतु काल 26 ऑक्टोबर 2024 रोजी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहिर करण्यात आली त्यामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रासाठी दिलीप बनसोड यांचे नाव दिसल्याने विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण कार्यकर्तामध्ये तिव्र नाराजी दिसून आली त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नुकसान होऊ नये व क्षेत्राला काँग्रेसचे नेतृत्व मिळावे म्हणून सर्व काँग्रेस कार्यकर्त्यात नाराजीचा सूर घेऊन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सर्व कार्यकर्त्याचा आदर करून व जनसामान्याचा विचार करून काल प्रसिद्ध झालेल्या उमेदवाराला बदलवून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याकरिता विचार करावा असे सर्वानुमते पत्र परिषदेत विचार ठेवण्यात आला यामध्ये प्रामुख्याने 8 सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या निवेदना मधील सर्व स्थानिक उमेदवार उपस्थित असून काँग्रेसचा तळागाळातील कार्यकर्ता व सर्वसामान्य जनता उपस्थित राहून नाना पटोले यांना उमेदवारी बदलण्याची 29 ऑक्टोंबर पर्यंत संधी असल्यामुळे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचा मत विचारत घेऊन व त्यांच्या भावना लक्षात घेऊन स्थानिक उमेदवाराला उमेदवारी देण्याबाबत फेरविचार करावा अशी मागणी या पत्रकार परिषदेत सर्व ज्येष्ठ वरिष्ठ कनिष्ठ कार्यकर्त्यांनी पुतळा गळ्यातल्या कार्यकर्त्याकडून पदाधिकाऱ्याकडून विनंती करण्यात आली जर या बाबीच्या नानाभाऊंनी विचार न केल्यास काँग्रेस पक्षाला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही व एकंदरीत पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे या सदर बाब लक्षात आणून द्यावा व दुरुस्त करण्याची कारवाई करावी अशी विनंती पत्र परिषदेत करण्यात आली.

error: Content is protected !!