आज 38 उमेदवारांचे 50 नामनिर्देशनपत्र दाखल : 49 अर्जाची उचल
गोंदिया, दि.28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 28 ऑक्टोबर रोजी 38 उमेदवारांनी 50 नामनिर्देशपत्र दाखल केले व 49 अर्जाची उचल करण्यात आली आहे.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात सुजित विक्रम खरोले (अपक्ष), प्रफुल गुणवंतराव ठमके (अपक्ष), डॉ.बबन रामदास कांबळे (अपक्ष), यशवंतराव धनुजी उके (अपक्ष), निता निलकंठ साखरे (अपक्ष), राजकुमार सुदाम बडोले (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी)- 2 नामांकनपत्र, बन्सोड दिलीप वामन (इंडियन नॅशनल काँग्रेस)- 2 नामांकनपत्र, दिनेश रामरतन पंचभाई (वंचित बहुजन आघाडी), रिता अजय लांजेवार (इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, राजेन्द्र काशिनाथ टेंभुर्णे (अपक्ष), नंदागवळी राजेश मुलचंद (इंडियन नॅशनल काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र.
64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातून सोनु रमेश टेंभेकर (बहुजन समाज पक्ष व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, निरजकुमार भुमेश्वर मिश्रा (अपक्ष), ओमप्रकाश राधेलाल पटले (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, मनोज युवराज डोंगरे (अपक्ष), बोंदरे राजेन्द्र दामोदर (अपक्ष), खुशाल देवाजी कोसरकर (अपक्ष), सुरेश दादुजी टेंभरे (अपक्ष), वनिता बेनिलाल ठाकरे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, दिनेश दुधराम टेकाम (जनसेवा गोंडवाना पार्टी), रविंद्र दिलीप सोयाम (अपक्ष), विजय भरतलाल रहांगडाले (भारतीय जनता पार्टी)- 2 नामांकनपत्र.
65-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून प्रदीप वासनिक (अपक्ष)- 3 नामांकनपत्र, विनोद अग्रवाल (भारतीय जनता पार्टी), सविता अग्रवाल (भारतीय जनता पार्टी व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, नागेश्वर दुबे (अपक्ष), सुरेंद्र उके (अपक्ष), भुमेश्वर हरिणखेडे (अपक्ष), सुरेश चौधरी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), गोविंद तिडके (अपक्ष), फिरोज खान (AIMIM व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, अरुण गजभिये (अपक्ष), नरेंद्र मेश्राम (बहुजन समाज पार्टी).
66-आमगाव विधानसभा मतदारसंघातून डॉ.अनिल समारु कुंभरे (अपक्ष), चाकाटे विलास पंढरी (अपक्ष), राजकुमार लोटु पुराम (इंडियन नॅशनल काँग्रेस), संजय हनवंतराव पुराम (भारतीय जनता पार्टी)- 2 नामांकनपत्र.
आज उचल करण्यात आलेले अर्ज पुढीलप्रमाणे. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ- 14 अर्ज. 64-तिरोडा विधानसभा मतदारसंघ- 15 अर्ज. 65-गोंदिया विधानसभा मतदारसंघ- 10 अर्ज व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघ- 10 अर्ज. असे एकूण 49 अर्जाची उचल करण्यात आली.