आज 66 उमेदवारांचे 82 नामनिर्देशनपत्र दाखल
गोंदिया, दि.29 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 29 ऑक्टोबर रोजी 66 उमेदवारांनी 82 नामनिर्देशपत्र दाखल केले.
आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात रत्नदीप सुखदेव दहिवले (अपक्ष), ॲड.पोमेश सुखदेव रामटेके (भारतीय जनता पार्टी), विश्वनाथ नत्थु खोब्रागडे (अपक्ष), निता निलकंठ साखरे (अपक्ष), अजय संभाजी लांजेवार (इंडियन नेशनल काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, नितेश अनिल बोरकर (अपक्ष), जगन उर्फ जयेश बारसुजी गडपाल (अपक्ष), निशांत हिरालाल राऊत (अपक्ष), दानेश मदन साखरे (अपक्ष), किरण यशवंत कांबळे (इंडियन नेशनल काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, चंद्रिकापुरे सुगत मनोहर (अपक्ष), डॉ.भारत बाजीराव लाडे (इंडियन नेशनल काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, हरिषकुमार देवराव बन्सोड (अपक्ष), मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे (अपक्ष), किरण महादेव कटारे (अपक्ष), सचिनकुमार नांदगाये (बहुजन समाज पक्ष), अनिलकुमार प्रेमलाल मेश्राम (अपक्ष), महेश उर्फ मिथुन मनोजकुमार मेश्राम (अपक्ष), अजय सुरेश बडोले (अपक्ष), भावेश उत्तम कुंभारे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), दिनेश रामरतन पंचभाई (अपक्ष), प्रदीपकुमार शिवराम गणवीर (अपक्ष), अशोककुमार मोतीराम लांजेवार (अपक्ष), केतन आसाराम मेश्राम (अपक्ष), अनिल रविशंकर राऊत (अपक्ष), कश्यप भिमराव मेश्राम (पिपल्स पार्टी इंडिया डेमोक्रेटीक).
64-तिरोडा विधानसभा मतदारसंघातून रमेशकुमार ताराचंद ठाकुर (अपक्ष), नितेश शालीकराम खोब्रागडे (अपक्ष)- 2 नामांकनपत्र, नरेंद्रकुमार गणपतराव रहांगडाले (अपक्ष), जितेन्द्र बाबुलाल कटरे (इंडियन नेशनल काँग्रेस व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, अजय विश्वनाथ आंजनकर (अपक्ष), निरजकुमार भुमेश्वर मिश्रा (अपक्ष), अतुल मुरलीधर गजभिये (वंचित बहुजन आघाडी), निलेश प्रदिप रोडगे (बहुजन समाज पक्ष व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, राजेश माधोराव आंबेडारे (बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी), गजभिये कैलाश बुधराम (अपक्ष), प्रतापकुमार तिलकचंद पटले (संभाजी ब्रिगेड), रविंद्र दिलीप सोयाम (पिपल्स युनियन पार्टी), चंपालाल दशरथ साठवणे (बहुजन समाज पार्टी), रविकांत खुशाल बोपचे (नेशनलीस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार गट).
65-गोंदिया विधानसभा मतदारसंघातून विनोद अग्रवाल (भारतीय जनता पार्टी)- 2 नामांकनपत्र, प्रमोद गजभिये (हिन्दूस्तान जनता पार्टी), अरुण गजभिये (अपक्ष), फिरोज खान (AIMIM व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, प्रेमलाल लिल्हारे (अपक्ष), सतीश बन्सोड (वंचित बहुजन आघाडी), राजीव ठकरेले (अपक्ष), हरिशकुमार नागपुरे (अपक्ष)- 2 नामांकनपत्र, लक्ष्मण नागपुरे (अपक्ष), चंद्रशेखर लिचडे (जननायक जनता पार्टी व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, डॉ.बडोले विनोद काशिराम (अपक्ष), सुरेश दादुजी टेंभरे (अपक्ष), गोपालदास अग्रवाल (इंडियन नेशनल काँग्रेस)- 4 नामांकनपत्र, अरुणकुमार चौहान (भारतीय संपूर्ण क्रांतीकारी पार्टी), अविनाश नेवारे (अपक्ष), जनार्दन बान्ते (लोकस्वराज पार्टी), राजेशकुमार डोये (राईट टू रिकाल पार्टी).
66-आमगाव विधानसभा मतदारसंघातून राजकुमार लोटु पुराम (इंडियन नॅशनल काँग्रेस), देवविलास तुकाराम भोगारे (राष्ट्रीय गोंडवाना पार्टी व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, शंकरलाल गुणेजी मडावी (भारतीय जनता पार्टी व अपक्ष)- 2 नामांकनपत्र, दिलीप रामाधिन जुळा (बहुजन समाज पार्टी)- 2 नामांकनपत्र, निकेश झाडू गावळ (वंचित बहुजन आघाडी), वामन पुनेश्वर शेळमाके (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), कोकोडे दुर्गाप्रसाद लक्ष्मण (अपक्ष), वासुदेव भिकु घरत (अपक्ष), यशवंतराव ओकटू ताराम (अपक्ष).
गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून आजपर्यंत 105 उमेदवारांनी 153 नामनिर्देशनपत्र दाखल केले.