प्रहार चे उमेदवार डॉ.सुगत चंद्रिकापुरे नी फोडला प्रचाराचा नारळ
सडक अर्जुनी : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उमेदवारांनी प्रचाराचे रणशिंगफुंकले आहे, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या सोबतच आता प्रहार जनशक्ती देखील राज्यात जोमाने कामाला लागली आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभेतील अधिकृत उमेदवार सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांना प्रहार जनशक्तीच्या वतीने बच्छु कडू यांनी उमेदवारी दिलीआहे. दिनांक 05 नोव्हेंबर रोजी साकोली तालुक्यातील उकारा येथील शिव मंदिर येथे त्यांनी पूजा अर्चना केली. तसेच गोरेगाव तालुक्यातील मांडोदेवी देवस्थान येथे देखील पूजा अर्चना केली व मोरगाव अर्जुनी तालुक्यातील चारभट्टी येथील प्रसिद्ध हनुमानजी यांच्या मंदिरात पूजा अर्चना करून आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात केली आहे.
दरम्यान वाहनांचा ताफा कार्यकर्त्यांची गर्दी पाहावयास मिळाली, राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यकर्ते डॉक्टर सुगत चंद्रिकापुरे यांच्या सोबत आहेत.आम्ही त्यांना येत्या निवडणुकीत विजयी करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.