Saturday, August 23, 2025
सड़क अर्जुनी

डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

सडक अर्जुनी – प्रहार जनशक्ती पक्ष ,परिवर्तन महाशक्ती व गोंडवाना गणतंत्र पार्टी यांचे संयुक्त विधानसभा क्षेत्राचे अधिकृत लोकप्रिय युवा उमेदवार डॉ. सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रचार दौरा मतदार संघातील शेंडा जिल्हा परिषद क्षेत्रातून सुरू करण्यात आला.

तर दुसऱ्या दिवसाचा प्रचार दौरा चिखली व सौदड जी प. क्षेत्रातून करण्यात आली.प्रचार दौऱ्याप्रसंगी शेंडा , चिखली व सौंदड जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात पोहोचून आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी गावातील नागरिकांचे तसेच मतदारांचे आशीर्वाद घेतले.

विविध गावातील महिलांनी ओवाळणी करून उमेदवार डॉ सुगत चंद्रिकापुरे यांना कुंकू टिलक व हार घालून तसेच पुष्पगुच्छ देऊन निवडणुकीकरिता शुभेच्छा दिल्या. व आम्ही तुमच्यासोबत निवडणुकीत आहोत असा विश्वास दिला . प्रचार दौऱ्याप्रसंगी केवळ जिल्हा परिषद क्षेत्रातील नव्हे तर तालुक्यातील युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या प्रचार दौऱ्यातील युवा समर्थनाने मतदारांमध्ये आता तिसऱ्या आघाडीशिवाय आपल्याला पर्याय उरला नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना धडकी भरली आहे.

error: Content is protected !!