राजकुमार बडोले यांचे प्रचारार्थ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सडक/अर्जुनी येथे विराट सभा
सडक अर्जुनी – भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर विराट सभा आज 11 वाजता पंचायत समीती सडक/अर्जुनी येथील पंचायत समीतीच्या पटांगणावर आयोजीत करण्यात आली आहे.
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्ष महायुतीचे लोकप्रिय अधिकृत उमेदवार इंजि. राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ भाजपाचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांची जाहीर सभा आज सकाळी 11 वाजता सडक अर्जुनी येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
आपल्या न्याय हक्कासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील आपल्या हक्कासाठी उभा राहणारा आपल्या विश्वासाचा नेता म्हणून इंजिनीयर राजकुमार बडोले हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सध्या त्यांचा या मतदारसंघात प्रचंड जनाधार वाढत असून मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती व आपुलकी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते निवडणूक प्रचारासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा मध्ये येत आहेत. त्यासाठी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार बंधूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.