विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकुमार बडोले, भाजप चे विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले व संजय पुराम विजयी
गोंदिया, दि.23 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) उमेदवार राजकुमार बडोले, तिरोडा विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद अग्रवाल आणी आमगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम विजयी झाले. त्यांना संबंधीत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधीकारी यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 19 उमेदवारांनी निवडणूक लढविली. या निवडणूकीत 2 लाख 58 हजार 966 मतदारांपैकी 1 लाख 81 हजार 286 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार बडोले यांना 82 हजार 506 व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिलीप बन्सोड यांना 66 हजार 91 मते पडली. राजकुमार बडोले यांनी दिलीप बन्सोड यांचा 16 हजार 415 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 801 मते पडली.
तिरोडा विधानसभा मतदारसंघातून एकूण 21 उमेदवारांनी निवडणूक लढवीली. या निवडणूकीत 2 लाख 71 हजार 79 मतदारांपैकी 1 लाख 76 हजार 751 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय रहांगडाले यांना 1 लाख 2 हजार 984 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) उमेदवार रविकांत बोपचे यांना 60 हजार 298 मते पडली. विजय रहांगडाले यांनी रविकांत बोपचे यांचा 42 हजार 686 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 747 मते पडली.
गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एकूण 15 उमेदवारांनी निवडणूक लढवीली. या निवडणूकीत 3 लाख 25 हजार 556 मतदारांपैकी 2 लाख 31 हजार 385 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद अग्रवाल यांना 1 लाख 43 हजार 12 व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांना 81 हजार 404 मते पडली. विनोद अग्रवाल यांनी गोपालदास अग्रवाल यांचा 61 हजार 608 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1471 मते पडली.
आमगाव विधानसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवारांनी निवडणूक लढवीली. या निवडणूकीत 2 लाख 69 हजार 499 मतदारांपैकी 1 लाख 95 हजार 184 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय पुराम यांना 1 लाख 10 हजार 123 व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजकुमार पुराम यांना 77 हजार 402 मते पडली. संजय पुराम यांनी राजकुमार पुराम यांचा 32 हजार 721 मतांनी पराभव केला. यामध्ये नोटाला 1194 मते पडली.