घोटी चे माजी सरपंच दिनेश कोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प) मध्ये घर वापसी
गोंदिया/सडक अर्जुनी – घोटी (सडक/अर्जुनी) माजी सरपंच दिनेश कोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घर वापसी व तालुका युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात घव घवित यश प्राप्त झाल्यानंतर ग्राम घोटी (सडक अर्जुनी) येथील माजी सरपंच श्री दिनेश कोरे यांनी खा.श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, रेलटोली गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते दुपट्टा वापरून घर वापसी केली. यावेळी त्यांची सडक/अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. स्थानिक पातळीवरील काही कारणांमुळे ते पक्षापासून दूर होते, त्यांच्या या घर वापसीमुळे पक्षाला बळकटी येणार असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, यशवंत गणवीर, अविनाश काशिवार, किशोर तरोणे, सुरेश हर्षे, लोकपाल गहाणे, राजू एन जैन, केवल बघेले, केतन तुरकर, अखिलेश सेठ अन्य पदाधिकारी उपस्थित होते.