Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

लोहिया विद्यालयात संविधान दिवस साजरा

सौंदड : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय , जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात दि. 26 नोव्हेंबर 2024 रोज मंगळवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक – संस्थाध्यक्ष मा. जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ.न घाटबांधे विद्यालयाच्या प्राचार्या मा.उमा बाच्छल , मा.गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे ,पर्यवेक्षक मा.डी. एस. टेभूर्णे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाच्या पुस्तकाला पुष्पहार अर्पण केले. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी “संविधान हा आपल्या देशाचा आरसा आहे, विद्यार्थ्यांनी संविधानाचे वाचन करून संविधानाची तत्वे अंगीकृत करावी.” असे मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्राचार्या मा.उमा बाच्छल , मा.गुलाबचंद चिखलोंडे, पर्यवेक्षक डी.एस टेंभुर्णे, यांनी संविधानाबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच वर्ग दहावीची कु.निकिता भेंडारकर या विद्यार्थिनीने 26 नोव्हेंबर संविधान दिनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी 26 नोव्हेंबरला मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना दोन मिनिटांचे मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स . शिक्षिका कू.यू.बी . डोये यांनी केले तर आभार स.शिक्षक टी.बी.सातकर यांनी मानले.

error: Content is protected !!