मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटन द्वारे आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन
सडक अर्जुनी – दिनांक ११/१२/२०२४ , बुधवारला , सडक अर्जुनी तालुक्यात , मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटन अंतर्गत कार्यरत असलेले सर्व विभागाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित असून प्रशिक्षणार्थी यांचं 6 महिन्याची प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर त्याच ठिकाणी कायम स्वरुपी रुजू करण्यासाठी अर्जुनी मोरगाव विधान सभा चे आमदार राजकुमार बडोले यांना निवेदन देण्यात आले. तसेच आर. आर. सानप सर गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय सडक अर्जुनी, तहसीलदार साहेब , तहसील कार्यालय सडक अर्जुनी यांना जाहीर निवेदन देण्यात आला आहे.
निवेदनात सर्व प्रशिक्षणार्थी यांचे कामाचे कौतुक करण्यात आले व आपण ज्या ज्या विभागात काम करीत आहोत त्या ठिकाणी कायम स्वरुपी रुजू करण्यात यावा तसेच इतर मुद्या संधर्भात मुद्दे नमूद केले आहेत. निवेदन सादर करताना अध्यक्ष – जगदिप शहारे ,उपाध्यक्ष – रंजित पारधी, सचिव – प्रितम गोबाडे, कोषाध्यक्ष – पवन झिंगरे तसेच मोठ्या संख्येने सदस्य तसेच विविध विभागातील सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.