आमदार बडोले यांच्या हस्ते राष्ट्रवादी दिनदर्शिकेचे प्रकाशन
सडक अर्जुनी – अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिनदर्शिकेचे मुद्रण करण्यात आले सदर मुद्रणाच्या 5000 प्रतींचे प्रकाशन आज माननीय आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सडक अर्जुनी येतील कार्यालयात करण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की अर्जुनी मोरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिनदर्शिका ही दरवर्षीच माननीय प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात प्रकाशित केल्या जाते या दिनदर्शिकामध्ये वर्षभरात येणारे संपूर्ण सण त्याचप्रमाणे महापुरुष व संतांचे पुण्यतिथी व जन्मदिवस त्याचप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी व कार्तिक वारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांचे जन्मदिवस तसेच बुत कार्यकर्त्यांचे जन्मदिवस यांचा विशेष उल्लेख करून सदर दिनदर्शिका उल्लेख करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे सदर दिनदर्शिका वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अजित दादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे माननीय प्रफुल पटेल त्याचप्रमाणे माननीय राजेंद्र जैन यांच्या प्रतिमा मुद्रित करण्यात आलेले आहे सदर दिनदर्शिका ही सहा पानांची असून उत्कृष्ट दर्जात्मक मुद्रण केल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भिंतीवर शोभून दिसणारी असल्याचे उल्लेख राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष लोकपालजी गहाणे यांनी केला आहे.
आज माननीय राजकुमार बडोले यांच्या सडक अर्जुनी कार्यालयात सदर दिनदर्शिका चे प्रकाशन माननीय आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित माननीय लोकपालजी गहाणे किशोर तरोणे. योगेश नाकाडे. शुकदेव मेंढे. कालिदास पुस्तोडे. चुनीलाल येरणे. रामदास बोरकर .एकनाथ बोरकर. व विविध कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी दिनदर्शिका ही तालुक्यातील प्रत्येक बुथवर प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी पोहोचवण्याचे नियोजन करावे असे सूचना माननीय आमदार राजकुमार बडोले यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.