कोहमारा येथे महिलेची हत्या; आरोपी पसार
सडक अर्जुनी – डुग्गीपार पोलिस ठाण्यांतर्गत कोहमारा येथे ६ जानेवारी रोजी एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. देवेंद्रबाई पंढरी खोब्रागडे (५७) रा. कोहमारा असे मृत महिलेचे नाव असून हत्या केल्यानंतर आरोपी पसार झाला आहे.
सविस्तर असे असे देवेंद्राबाई पंढरी खोब्रागडे यांची हत्या झाल्याची बातमी ६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पसरताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दरम्यान घटनास्थळावर प्राथमिक चौकशी केली असता, या महिलेची हत्या १ ते २ दिवसापुर्वी झाली असावी,असा संशय निर्माण झाला. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी घटनास्थळी भेट देवून श्वानपथकाला पाचारण केले. देवेंद्राबाई ही एकटीच राहत होती तिची हत्या कोणी व कशी केली संशयास्पद असून पुढील तपास पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात देवरीचे डीवायएसपी विवेक पाटील तसेच की,डुग्गीपार पोलीस स्टेशनचे ठाणेदार मंगेश काळे करीत आहेत.