पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षीत पदांची सोडत 10 जानेवारीला
गोंदिया,दि.9 : महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभागाची अधिसूचना दि.4 ऑक्टोबर 2022 नुसार गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार पुढील अडीच वर्षाच्या कालावधीकरीता जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या सभापती पदाच्या आरक्षीत पदांची सोडत 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात काढण्यात येणार आहे. सदर सोडतीचे वेळी सर्व पंचायत समिती सदस्य व गोंदिया जिल्ह्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी तसेच इच्छुक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.