दामिनी पथकाचे नक्सलग्रस्त बोरगांव बाजार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
गोंदिया – पोलीस अधिक्षक गोंदिया श्री गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत दामिनी पथक यांनी दिनांक १०/०१/२०२५ रोजी नक्सलग्रस्त देवरी तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा, बोरगांव बाजार येथील विद्यार्थाना सायबर क्राईम,
(ऑनलाईन फसवणूक) लैंगिक अत्याचारापासुन बालकाचे संरक्षण अधिनियम २०१२, मोटार वाहन अधिनियम, रस्ता सुरक्षा, बालविवाह, बालविवाह मुक्त भारत , तसेच विद्यार्थांना लैंगिक छळवणूक ईत्यादी बाबद विद्यार्थाना उत्तम प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच कठीण प्रसंगी आत्मसंरक्षण (सेल्फ डिफेन्स) चे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
सदर मार्गदर्शन दामिनी पथकाचे म. पोउपनि. पुजा सुरळकर, पोशि राजेंद्र अंबादे, रमेंद्रकुंमार बावनकर मपोशि वैशाली भांदक्कर, पुनम मंजुटे, नापोशि. राधेश्याम रहांगडाले , इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी चे दीपमाला भालेराव , अँड. दीपक केसरकर आणि अँड विमल भाजीपाले यांनी केले.
तसेच सदर विद्यालयाचे प्राचार्य सर व इतर शिक्षक गण यांचे उत्तम असे सहकार्य लाभले.