सडक अर्जुनी पंचायत समिती च्या सभापती पदी चेतन वडगाये तर उपसभापती निशा काशिवार
सडक अर्जुनी – जिल्ह्यातील सडक अर्जुनी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाकरीता आज २० जानेवारीला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ड्व्वा(पळसगाव) क्षेत्राचे पंचायत समिती सदस्य चेतन वडगाये यांची निवड सभापती पदाकरीता झाली आहे.
सभापती पद हे अनुसूचित जमातीकरीता राखीव होते. तर उपसभापती पदावर पंचायत समितीच्या सदस्या निशा काशीवार यांची निवड करण्यात आली आहे.