कोसमघाट मध्ये अतिक्रमणावर वन विभागाचा चालला बुलडोझर
सडक अर्जुनी – आज दिनांक 28.01.2025 रोजी सडक/ अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या कोहमारा सहवनक्षेत्रातील बिट कोहमारा अंतर्गत मौजा कोसमघाट येथे अतिक्रमण धारक श्री. दुर्जन अर्जुन मानकर रा. कोसमघाट यांनी अवैधरित्या अतिक्रमण केले होते. त्यांचे नांवे प्र. सु.री. जारी करण्यात आले होते व त्यांना अतिक्रमण सोडण्याबाबतचे नोटिस सुध्दा देण्यात आले होते.
सदरचे अतिक्रमण क्षेत्रात त्यांनी शेती करण्याचे दृष्टिने बांध्या तयार केल्या होत्या.कोहमारा बिटातील कक्ष क्र. 834 अवर्गिकृत वनातीला गट क्र. 42 मध्ये 0.9414 हे. आर व 0.2732 हे. आर वनजमिनीवर अवैधरित्या कब्जा केले. त्या अनुषंगाने मा. सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया वनविभाग, गोंदिया तसेच मा.न्यायदंडाधिकारी, गोंदिया यांनी सदरचे अतिक्रमण निष्कासीत करण्याचे आदेश दिले असल्याने आज दिनांक 28.01.2025 रोजी मौजा कोसमघाट येथील गट क्र. 42 मधील अवैध अतिक्रमण हटविण्याचे नियोजन केले. त्यानुसार आज मौक्यावर सर्व वनअधिकारी / कर्मचारी वन नमजूर यांचे सोबत जावुन मा. न्यायालयाचे आदेशानुसार अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करण्यात आली.
यामध्ये गट क्र. 42 मध्ये0.9414 हे.आर व 0.2732 हे. आर अतिक्रमण क्षेत्रापैकी 0.75 हे. आर व 0.27 हे. आर असे एकूण 1.02 हे. आर. अतिक्रमण क्षेत्र निष्कासीत करण्यात आले.सदर प्रकरणी वनविभाग, महसूल विभाग व पोलिस विभाग मिळुन कार्यवाही करण्यात आली. त्यावेळी एस. एम.डोंगरवार, सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया वनविभाग, गोंदिया, मिथुन डी. तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सडक् / अर्जुनी, जे.आय. जांभुळकर, नायब तहसिलदार सडक/अर्जुनी, मंगेश काळे, पोलिस निरिक्षक डुग्गीपार ,पी.डी. बांबोर्डे API डुग्गीपार, कु आर. बी. पवार API डूग्गीपार, पि. एल. आढाव, पोलिस उपनिरिक्षक (SRPF) यु.पि. गोटाफोडे,क्षेत्रसहायक जांभडी, एस. के. पटले, क्षेत्रसहायक कोहमारा, पि. एम. पटले, वर. सौंदड – 2 एम. व्ही. चव्हान, व.र. कोहमारा, पी.बी. हत्तीमारे, व. र. डुग्गीपार, कु. एच. एम. बागळकर, व. र. कनेरी, कु. आय. पि. राऊत, व.र. खोबा, कु. डी. डी. लांजेवार, व.र. मोगरी,समिर बंसोड वाहन चालक, व इतर वनकर्मचारी यांनी सहकार्य केले.सोबत समक्ष पंच म्हणुन सौ. निशा सुनिल मुनेश्वर रा. कोसमघाट पोलिस पाटिल, श्री. राकेश दुधराम कोरे रा. मनेरी उपसरपंच कोसबी, श्री. दशरथ तिमाजी पंधरे रा. कोसमघाट तसेच समस्त गांवकऱ्यांनी उपस्थित राहुन अतिक्रमण काढण्यास सहकार्य केले.सदरची कार्यवाही मा. उपवनसंरक्षक, गोंदिया वनविभाग, गोंदिया यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.