Monday, May 12, 2025
सड़क अर्जुनी

सडक अर्जुनी – अज्ञात वाहणाच्या धडकेत बिबट चा मृत्यू

सडक अर्जुनी :- दी. 29 जाने. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोकणा खोबा जवळ एका बिबट चा अज्ञात वाहणाच्या धडकेत मृत्यु झाला आहे, घटना स्थळी वन विभागाचे अधिकारी पोहचले, असून घटनेची नोंद घेतली आहे.

सविस्तर असे की, रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.२९) रात्री ८ वाजताच्या सुमारास नवेगावबांध-कोहमारा मार्गावरील खोबाजवळ घडली.

नवेगावबांध-कोहमारा मार्गालगत नवेगाव व्याघ्र प्रकल्प लागून आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच वन्यप्राण्यांचा वावर असतो. बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास एक बिबट्या रस्ता ओलांडताना त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

यात बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान खोबा येथील गावकऱ्यांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे हे घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पंचनामा करून क्षेत्र सहायक संजय पटले, वनरक्षक प्रदीप हत्तीमारे, मुकेश चव्हाण, पुरुषोत्तम पटले, इंदू राऊत, वनमजूर रमेश मेश्राम, वाहन चालक समीर बन्सोड यांच्या मदतीने त्या मृत बिबट्याला कोहमारा वनक्षेत्रात नेण्यात आले. पुढील तपास वन विभागाचे कर्मचारी करीत आहेत.

error: Content is protected !!