महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचे माननीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना निवेदन
• गोंदिया जिल्ह्याकरिता अतिरिक्त घरभाडे भत्ता टॅब शालार्थ वेतन प्रणाली मध्ये सुरू करा.
• महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाचे माननीय शिक्षण उपसंचालक पुणे यांना निवेदन.
गोंदिया – संपूर्ण गोंदिया जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्हा आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी व अतिरिक्त घरभाडे भक्ता शासनाने लागू केलेला आहे.गोंदिया जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन प्रणाली मध्ये सुरू आहे परंतु मार्च 2023 पासून शालार्थ वेतन प्रणाली मधून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरीता बंद करण्यात आलेली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरिता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब शालार्थ वेतन प्रणाली मध्ये सुरू करण्यासंबंधी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने गोंदिया जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम मुरुगानंथम व प्राथमिक शिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेचे फलित म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक संचालनालय पुणे यांना दिनांक 17 ऑगस्ट 2024 ला पत्र लिहून कळविले होते.
परंतु आत्तापर्यंत शालार्थ वेतन प्रणाली मध्ये सुरू झालेली नाही.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघ जिल्हा गोंदियाने जिल्ह्यातील आमदार राजकुमार बडोले, विजयभाऊ रहांगडाले, विनोदभाऊ अग्रवाल यांच्याशी चर्चा करून अतिरिक्त घर भाडे व त्याची टॅब सुरू करण्यासंबंधी चर्चा केली. यामुळे सर्व आमदारांनी शिक्षण संचालक पुणे यांना पत्र लिहून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरिता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू करण्यासंबंधी पत्र लिहिले होते.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया ही जिल्ह्यातील शिक्षकांच्या हक्काकरिता लढणारी एकमेव संघटना असल्याची प्रचिती सर्वांना करून दिली.
गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांकरिता अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब सुरू झालीच पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर व उपाध्यक्ष शंकर चौहान यांनी शिक्षण उपसंचालक देविदास कुल्हाड यांच्याशी सातारा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेदरम्यान चर्चा केली. जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांच्याशी फोनवर चर्चा करून गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांच्या बंद झालेल्या अतिरिक्त घरभाडे भत्त्याची टॅब संबंधी चर्चा करून टॅब सुरू करण्यासंबंधी विनंती केली.
त्याहीपुढे जाऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक सोसायटीचे उपाध्यक्ष शंकर चव्हाण शाखाध्यक्ष कैलाश हांडगे जिल्हा प्रतिनिधी गजानन रामटेके सरचिटणीस सुरेश अमले उपाध्यक्ष सत्यवान गजभिये रमेश बिसेन मनोज नेवारे यांनी शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे कार्यालयात शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे यांच्याशी भेट घेवून चर्चा केली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या प्रयत्नाला नक्कीच लवकरच यश येऊन बहुप्रतीक्षित मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने लवकरच पूर्ण होणार असे आश्वासन जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी दिले आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.