Monday, May 12, 2025
अर्जुनी मोर

अर्जुनी/मोर ला सोनालिका ट्रॅकर शोरुम चे उद्घाटन थाटात

अर्जुनी मोरगाव : अर्जुनी मोरगाव येथे सोनालिका ट्रॅक्टर च्या नव्या ब्रांच चे आज ओपनिंग झाले, वडसा कोहमारा मार्गांवर सोनालिका ट्रॅक्टर चे शोरूम असून आज 22 फेब्रुवारी रोजी या नव्या ब्रांच चे थाटात उदघाटन झाले, स्टार सोनालिका सेंटर सौन्दड शी ही ब्रांच संलग्न असून संपूर्ण जिल्ह्यात सोनालिका ट्रॅक्टर चे काम सौंदड येथून पाहिले जाते, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राहकांना जवळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देश्याने नव्या ब्रांच चे ओपनिंग करण्यात आले, यावेळी सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचे प्रमुख पदाधिकारी, शेतकरी बांधव, सोनालिका ट्रॅक्टर चे डीलर, इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी, बँकेचे मॅनेजर, ग्राहक व स्टार सोनालिका सेंटर सौन्दड चे कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, मंचावरून बोलताना सोनालिका ट्रॅक्टर कंपनीचे विदर्भ रिजनल म्यानेजर दुशान्त ठाकूर म्हणाले – पंजाब के होशियार पूर मे एक सोनालिका ट्रॅक्टर दो मिनिट मे निर्माण होता है, यें सच बात है आप प्लांट मे भी आये और स्व देखे तब जाके आप को विस्वास होगा, प्रत्यक्ष को प्रमाण की जरुरत नही होती, हमारे पास सोनालिका ट्रॅक्टर के कही मॉडेल है, जैसे के छत्रपती, टायगर 50, 55, 60, 65, 75 हौर्स पावर की गाडिया आती है, सरकार का नियम है की ज्यादा हौर्स पॉवर की गाडिया सीआरडी इंजन मे होनी चाहिये, 16 प्लस गैर स्पीड मे भी ट्रॅक्टर आ रहे है, आप की यहा की जमीन मजबूत है, इसके लिये दमदार ट्रॅक्टर चाहिये, जिसने ट्रॅक्टर का सपना नही देखा है, उनको भी सपना दिखाना है, सोनालिका ट्रॅक्टर गाव गाव, गली गली, घर घर पहुचाना है, सोनालिका ट्रॅक्टर ने अभि नया ट्रॅक्टर लाया है जिसकी किंमत आल इंडिया मे एक ही रहेगी, ट्रक्टर कही भी खरीदे, शो रूम की किंमत एक ही रहेगी, असे मत त्यांनी वेक्त करीत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी दुशान्त ठाकूर विदर्भ रिजनल म्यानेजर सोनालिका ट्रॅक्टर, शिवकुमार अग्रवाल डीलर स्टार सोनालिका ट्रॅक्टर सौन्दड, दिनेश मोदी डीलर स्टार सोनालिका ट्रॅक्टर सौन्दड, विलास कापगते नवेगावबांध सामाजिक कार्यकर्ते, अवनीत शिंग नागपूर के एरिया म्यानेजर सोनालिका ट्रॅक्टर, अमित वानखेडे ऍक्सीस बँक के मॅनेजर नागपूर ब्रांच , घनश्याम धामट सामाजिक कार्यकर्ता, इंदूताई लांजेवार नगर सेविका, सह शेतकरी व ग्राहक उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार अरुण बडोले यांनी केले, सोबत छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आता शेतकरी ट्रॅक्टर बिघाळाची तक्रार करणार थेट कंपनीला

सोनालिका कंपनीने आता कस्टमर केअर नंबर जारी केला आहे, शेतकरी कस्टमर केअर नंबर वर संपर्क करून तक्रार करेल तर त्याचे फोन आमच्या ब्रांच ला येईल, जो पर्यंत शेतकऱ्यांची तक्रारीचे निवारण होणार नाही, तो पर्यंत तक्रार पूर्ण होणार नाही, जे की ओटीपीच्या माध्यमातून काम होणार आहे, या मुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे काम कंपनी करीत असल्याचे मत मंचावरून ट्रॅक्टर डीलर यांनी सांगितले.

error: Content is protected !!