Monday, May 12, 2025
गोंदियासड़क अर्जुनी

सडक अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत गट क्र.171मधील रहिवासी कुटुंबियांना पट्टे देण्यात यावे

सडक अर्जुनी नगरपंचायत क्षेत्रातील 53 कुटुंबांना घराच्या जागेचे पट्टे शासनानी शिघ्र घ्यावे. गेली कित्येक वर्षापासून ही कुटुंब पट्टे पासून वंचित

    ( सदर प्रकरण 2020 पासुन प्रस्ताव प्रलंबितच )

आमदार साहेबाना निवेदन देताना नागरिक सदाराम लाडे
आमदार साहेबाना निवेदन देताना जेष्ठ नागरिक सदाराम लाडे

सडक अर्जुनी – शासकीय गट नं. 171. येथील 50 वर्षाचे पुर्वी पासुन घरे बांधुन येथे राहात असलेल्या 53. कुटुंबांना या घराच्या जागेचे पट्टे शासनानी शिघ्र द्यावे. अशा मागणीचे निवेदन अतिक्रमण धारक व‍ जेष्ठ नागरीक- सदाराम जैराम लाडे यांनी येथील 53. अतिक्रमण कुटुंबाच्या वतीने- अर्जुनी/मोर. 63.विधान सभाचे आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री  राजकुमार बडोले साहेब यांना २८ फेब्रुवारी २०२५ ला  निवेदन दिले.

निवेदनात लिहिले आहे की,   “आम्ही उपविभागीय अधिकारी अर्जुनी /मोर.यांचे कार्यालयात दिनांक- 27.08.2020. ला शासकिय गट.नं. 171.येथील सर्व 53.लोकांचे आवश्यक कागदपत्र जोडुन सामुहिक अर्ज फाईल दिली होती. मा.जिल्हाधिकारी, मा.पालक मंत्री. मा. प्रफुल्ल भाई पटेल यांचे कडे पाठपुरावा आम्ही 2020 ते आज 2025 पर्यंत करीत आहोत. पंरतु आजपर्यंत नगर पंचायत सडक अर्जुनी यांनी काहीच कार्यवाही केलेली नाही. 

     तसेच मा. जिल्हाधिकरी गोंदिया यांनी- या प्रकरणी तातळीने / तपासनी करुन नियमोचित कार्यवाही करण्यात यावी. केलेल्या कार्यवाही बाबद आवेदकास परस्पर कळवुन या कार्यालयास अवगत करण्यात यावे असे त्यांनी या कार्यालयाला व आम्हाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. “

नगरपंचायत सडक अर्जुनी येथे आम्ही वारणवार विचारणा करुनही आज पर्यंत कोणतीही माहीती दिलेली नाही. टाळाटाळ करीत आहेत.

आमदार साहेबाना निवेदन द्वारा विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी , जिल्हाधिकरी,  नगर विकास अधिकारी, भुमी अधिलेख, D. F. O. गोंदिया, .

उपविभागीय अधिकारी,  तहसीलदार, मुख्याधिकारी व संबधित सर्व अधिकारी यांची आढावा बैठक बोलवावी.

तसेच येत्या 03. मार्च. 2025 च्या अधिवेशनात- नगरपंचायत क्षेत्रातील शासकिय जागेवर अतिक्रमण करुन 50 वर्षाचे पुर्वी पासुन घरे बांधुन राहात असलेल्या अतिक्रमण धारकांना या घराच्या जागेचे पट्टे देण्याचा विषय याच अधिवेषणात मांडुन निकाली काढावा. आणि आपल्या विधानसभा क्षेत्रातील अतिक्रमण धारकांना शासनाकडुन पट्टे मिळवुन देऊन न्याय मिळवुन द्यावा.

अशा प्रकारचे निवेदन- अतिक्रमण धारक व जेष्ठ नागरीक- सदाराम जैराम लाडे.  यांनी गट नं.171.येथील 53.सर्व अतिक्रमण धारक नागरीकांच्या वतीने मा.आमदार – राजकुमार बडोले साहेब यांना दि.- 28.फरवरी.2025. ला स्वताः चर्चा करुन हे निवेदन दिले आहे.

मा.आमदार बडोले साहेबांनी हा विषय या अधिवेषणात लक्षवेधी सुचनेत मांडतो असे आस्वासन दिले आहे.

error: Content is protected !!