Monday, May 12, 2025
क्राइमगोंदियासड़क अर्जुनी

गांजा विक्री करणाऱ्या तिघांना डूग्गीपार पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डुग्गीपार पोलिस ठाण्या अंतर्गत तिघांना दुंडा फाटा पांढरी येथून जेरबंद करत ठोकल्या बेड्या

गोदिया – जिल्हास्तरावर एन.डी. पी. एस. कायद्यान्वये कारवाईची मोहीम राबविण्यात येत असून दिनांक- 06/03/2025 रोजी वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे जिल्ह्यात अवैधरित्या अंमली पदार्थाची तस्करी, साठा, वापर, विक्री व वाहतूक करणाऱ्या विरुद्ध मोहीम छेडत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तसेच पो. ठाणे डुग्गीपार येथील पोलीस पथकाने मिळालेल्या गोपनिय खात्रीशिर माहितीच्या आधारे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अंमली पदार्थ गांजा बाळगणाऱ्याविरुद्ध धाड कारवाई करून जेरबंद केले आहे.

पोलीस ठाणे डुग्गीपार पोलीस पथकाने आरोपी नामे – 2) कार्तिक शिवेंद्र कवरे रा. डुण्डा ता. सडक अर्जुनी 3) आदित्य ब्रम्हानंद धनविजय रा. खैरीदिवान ता. पवनी जि.भंडारा 4) विनय खुशाल बारापात्रे रा. आंधळगांव ता. मोहाडी जि. भंडारा यांना दुंडा पांढरी फाट्यावर वाहतूक करतांना संशयावरून सापळा रचून कारवाई करण्यात आली असता त्यांचे ताब्यातून अवैधरित्या 2 किलो 981 ग्रॅम ओलसर, पाने, फळे, बिया मिश्रित गांजा किंमती 59,620/- रुपये, एक मोटर सायकल किंमती 50 हजार, व ईतर साहित्य मोबाईल हँडसेट, दोन कॉलेज बॅग किं. 5700/- असा एकुण 01 लक्ष 15 हजार 320/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद तिन्ही आरोपी यांचे विरुद्ध पो ठाणे डुग्गीपार येथे NDPS कायद्याचे कलम 8(क),20,29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदरची धाड कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे दिशा निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी श्री. विवेक पाटील, पोलीस ठाणे डुग्गीपार चे पो. नि. श्री. मंगेश काळे यांचे नेतृत्वात मार्गदर्शनात सपोनी बांबोळे, पोलीस अंमलदार- अग्निहोत्री, जगदीश मेश्राम, रणजीत भंडारकर, हरिणखेडे, इंगळे, खोब्रागडे यांनी कारवाई केलेली आहे.

error: Content is protected !!