लोहिया विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
सौंदड:-येथील लोहिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेव बाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 8 मार्च 2025 रोज शनिवारला लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष माननीय जगदीश लोहिया यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोहिया शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा. आ. न .घाटबांधे, माजी सरपंच मा. गायत्री ताई इरले,मा. ॲड. रीता राऊत . पोलीस पाटील मा.सीमा निंबेकर, विद्यालयाच्या प्राचार्या मा. उमा बाच्छल, मुख्याध्यापक मा. मनोज शिंदे, पर्यवेक्षक मा.डी .एस. टेंभुर्णे, प्राध्यापक मा.आर. एन. अग्रवाल, स.शि. सौ. के. एस. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी माता सरस्वती, मा जिजाऊ , राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष मा.जगदीश लोहिया यांनी मुलींनी तिच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक भूमिका निर्भयपणे निभवावी असे मोलाचे मार्गदर्शन केले तसेच महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. मा. गायत्री ताई इरले , सीमा निंबेकर ,ॲड.रीता राऊत, प्राचार्या उमा बाच्छल या सर्वांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीत, पथनाट्य व आदर्श झालेल्या महिलांच्या भूमिका सादर केल्या.
कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स.शि. यू. बी.डोये यांनी केले तर आभार स. शि. वाय. एम. बोरकर यांनी मानले.