पोलिस स्टेशन डूग्गीपार येथे शांतता कमिटी ची सभा संपन्न
पोलिस स्टेशन डूग्गीपार येथे शांतता कमिटी ची सभा संपन्न
सडक अर्जुनी – पोलिस स्टेशन डूग्गीपार येथे आज दिनांक 10 एप्रिल रोजी देवरी चे उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील यांच्या अध्यक्षते मध्ये शांतता कमिटी ची सभा संपन्न झाली.
सविस्तर असे की, विशेष या महिन्यामध्ये धार्मिक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या जयंती कार्यक्रम साजरे होत असून सर्व कार्यक्रम शांततेत कशा तर्हेने पार पाडता येतील यावर , नियोजन, परवानगी,मंडळाची जबाबदारी, नागरिकांचे कर्तव्ये यावर विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांनी केले. तसेच सर्व प्रकारचे कार्यक्रम घेताना पोलिस स्टेशन ची परवानगी घेणे बंधन कारक आहे.या महिन्यात महात्मा फुले जयंती, हनुमान जन्मोत्सव , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच इतर कार्यक्रम मध्ये रॅली काढताना कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम करताना पोलिस स्टेशन ची ना हरकत परवानगी घेऊनच कार्यक्रम करावे अशी सूचना पोलिस अधिकाऱ्यांनी केली.
आपल्या देशात आणि राज्यात कायद्याचे राज्य आहे. सर्व कार्यक्रमे साजरी करताना सहकार्याची भावना ठेवून शांततेत साजरी करण्याचे आवाहन पोलिस विभाग अंतर्गत करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष म्हणून देवरी चे उप विभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, दुग्गीपार पोलिस ठाण्याचे थाणेदार मंगेश काळे, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष डॉ.अविनाश काशीवार, पोलिस पाटील संघटनेचे बी.परशुरामकर, जी. प.सदस्य कविता रंगारी, माजी स.सभा.राजेश नंदागवळी, शांतता कमिटी चे सदस्य तथा संपादक डॉ. सुशील लाडे, तसेच मेहजबीन राजानि , पत्रकार शाहिद पटेल, तालुक्यातील पोलिस पाटील तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.