सौंदड़ येथे रोजगार हमी योजने अंतर्गत कामांची सुरुवात
सौंदड़ येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांची सुरुवात – सरपंच हर्ष मोदी यांनी भूमिपूजन करून मजुरांशी साधला संवाद
सडक अर्जुनी – आज सौंदड़ ग्रामपंचायतीत रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी सरपंच हर्ष मोदी यांनी प्रत्यक्ष कामस्थळी भेट देत मजुरांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्व कामगारांना भरपूर पाणी प्यावे, डोकं झाकून काम करावे आणि आवश्यक विश्रांती घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. कामाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय देखील ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे.
याच दिवशी “राष्ट्रीय पंचायती राज दिन” निमित्ताने “सुभिक्षा दिवा” साजरा करण्यात आला. ग्रामविकासासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी पंचायती राज व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामस्थांच्या सहभागाने हा दिवस विशेष उत्साहात साजरा करण्यात आला.