Saturday, May 17, 2025
सड़क अर्जुनी

भाजप द्वारे सडक अर्जुनी येथे तिरंगा यात्रेचे आयोजन

सडक अर्जुनी – आतंकवाद विरोधात भारतीय सैनिकांनी अलौकिक यश मिळवले.”ऑपरेशन सिंदूर” ने जगाला भारतीय सैन्याचा भीमपराक्रम दाखवला.जगाने तो मान्यही केला.आतंकवादावरील हा विजय जात पात धर्माच्या,पक्ष आणि विपक्ष या पलीकडे आहे.

Oplus_131072

भारतीय सैन्याचा आम्हाला सदैव अभिमान आहे. आमचे सैनिक ऊन वारा पाऊस, जातपात धर्म न बघता हम सब एक है या भावनेतून देशाचे संरक्षण करतो.प्रत्येक भारतीय सीमेवर जाऊन शस्त्र हातात घेऊ शकत नाही.देश सेवा करू शकत नाही.मग ज्या भारत मातेच्या वीर सैनिकांनी देशाचा सन्मान वाढवला त्या सैनिकांच्या सन्मानार्थ दिनांक १७/०५/२०२५ रोज शनिवारला सकाळी ८:३० वाजता, सडक अर्जुनी दुर्गा चौक ते बस स्थानक सौंदड. येथे तिरंगा यात्रेचे आयोजित करण्यात आले होते.

या यात्रेदरम्यान भाजपा सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष राजेशजी कठाणे, भाजपा सौंदड तालुकाध्यक्ष विलासजी बागडकर, भाजपा माजी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, पंचायत समिती सभापती चेतनजी वडगाये, जिल्हा परिषद सदस्य भुमेश्वरजी पटले, कविताताई रंगारी, महिला मोर्चा अध्यक्ष रंजनाताई भोई, शितलताई गौर, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, तालुका महामंत्री हितेश डोंगरे, शहराध्यक्ष विनोद बारसागडे, डिलेश सोनटक्के, विवेक भेंडारकर विलास वट्टि तुलारामजी येरणे चरणदासजी शहारे, पुरुषोत्तमजी निंबेकर, नगरपंचायत नगरसेविका रजनीताई परिहार, संदीप रामटेके, गुड्डू डोंगरवार, देविदासजी कोवे,शिलाताई चव्हाण, लोकचंदजी कापगते, रमेशजी पारधी उपस्थित होते.

error: Content is protected !!