Tuesday, July 1, 2025
गोंदिया

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक सहकार पँनलच्या उमेदवारांचे नामांकन दाखल

 गोंदिया –   गोंदिया जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ची निवडणूक येत्या २९ जून २०२५ रोजी होणार आहे. आज नामांकन भरण्याचा शेवटचा होता यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षातील प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी मोठ्या उत्साहात व भव्य प्रदर्शन करीत आमदार विनोद अग्रवाल, आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार हेमंत पटले, माजी आमदार खोमेश रहांगडाले, माजी आमदार भेरसिंग नागपुरे, भाजपा जिल्हाध्यक्षा सिता रहांगडाले, रांका जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. गोंदिया जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा यांचे संयुक्त सहकार पॅनल सामोरे जाणार आहे.

तत्पूर्वी न.मा.द महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सभेला दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना हि निवडणूक जिंकण्याचा संकल्प केला. यावेळी मार्गदर्शन करतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले कि, गोंदिया जिल्हा बँक हि एकमात्र बँक आहे जी मागील १३ वर्षांपासून सतत फायद्यामद्ये राहिली असून राज्यात एक यशस्वी बँक म्हणून नावलौकिकास आली आहे. यावेळी मतदार, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!