चितळाचे मांस प्रकरणी वन विभागाची चार व्यक्तींवर कारवाई
सडक अर्जुनी – सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत जांभळी येथे चितळ मास प्रकरणी वन विभागाने कारवाही केली आहे. सविस्तर असे की, दिनांक 04.06.2025 रोजी सडक/ अर्जुनी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या जांभडी सहवनक्षेत्रातील नियत क्षेत्र जांभडी अंतर्गत मौजा जांभडी येथे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिनांक 04.06.2025 रोजी दुपारी4.00 वा. वन्यप्राणी चितळचे मांस (मटन) शिजविल्याची गुप्त माहिती मिळाली असता, सदर माहितीचे आधारे आरोपी क्र. 1 लालचंद तिलकचंद मेश्राम रा. जांभडी यांचे घराची चौकशी केली असता त्यांचे घरातील स्वयंपाक खोलीत एका जर्मन गंजीत वन्यप्राणी चितळचे मांस (मटन) शिजविल्याचे दिसून आले.
तेव्हा आरोपीस सदर मांस (मटन) बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरील मांस(मटन) हे चितळचे आहे. व माझे सोबत आणखी तिन ईसम आहेत. तेव्हा आरोपी क्र. 2) आनंद मानिकराम शेंदरे 3) संतोष हरीभाऊ मेंडे 4) पुरणलाल दुलीचंद जगनित सर्व रा. जांभडी यांचे घराची पाहणी केली असता त्यांचे घरी कोणत्याच प्रकारचे मांस (मटन) आढळूण आले नाही. परंतु त्यांनी वन्यप्राणी चितळचे मांस ( मटन) खाल्ल्याचे कबुली दिली.
तेव्हा त्यांना ताब्यात घेऊन भारतीय वन्यजिव (संरक्षण)अधिनियम 1972 नुसार अटक करून मा. न्यायालया समक्ष हजर करण्यात आले, मा. न्यायालयाने दिनांक 07.06.2025 पर्यात वन कोठडी सुनावली आहे.सदर प्रकरणी श्री. यु.पि. गोटाफोडे क्षेत्रसहायक जांभडी, श्री. ए. पि. नंदेश्वर बिटरक्षक जांभडी, श्री. टी. एम. बेलकर,बिटरक्षक डोंगरगांव/खजरी, श्री. एन. पि. मुंडे बिटरक्षक चिरचाडी, श्री. समिर बंसोड वाहन चालक व इतर वनकर्मचारी यांनी सहकार्य केले.
सदरची कार्यवाही मा. उपवनसंरक्षक, गोंदिया वनविभाग गोंदिया तसेच मा. सहायक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजिव) गोंदिया वनविभाग,गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच श्री. मिथुन डी. तरोणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी हे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.