रेती चोरी करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
सडक अर्जुनी – तालुक्यात अवैध रेती तस्करीला सुगीचे दिवस आले आहेत. अवैध रित्या रेती चोरी करणाऱ्यांवर शासकीय यंत्रणा मेहेरबान असल्याच्या चर्चा नागरिकांत होत असतात. रेती तस्कर ज्या प्रमाणात रेती चोरी करीत असतात मात्र त्या प्रमाणात कारवाया होत असतात काय? हा सुद्धा एक चिंतनाचा प्रश्नच नागरिकांत निर्माण झाला आहे. अवैध रित्या रेती चोरी मुळे मात्र लाखो रूपयांचा महसूल शासनाचा डूबत आहे. कित्येक वर्तमान पत्रांनी ह्या अवैध रित्या रेती चोरी संबंधी बातम्या प्रकाशित करून शासनाचे डोळे उघडण्याचे काम केले. परंतु पाहिजे त्या प्रमाणात कारवाया होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
मात्र दिनांक दिनांक 19/06/2025 रोजी सकाळी 09/15 वा. सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता पळसगाव/राका रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या 01 ट्रॅक्टरला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व आरोपी चालक/मालक नामे जितेंद्र हिरामन बावनकुळे वय 32 वर्षे रा.पळसगाव यांचे ट्रॅक्टर ट्रॉली क्र.MH 35 AW 5294 किं. 7,70,000/-रु. व त्यामध्ये एक ब्रास रेती किं.5000/-रु. असा एकुण 7,75,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीतांविरुद्ध कलम 303(2), 305 (E) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, पोहवा जगदीश मेश्राम, आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, पोशि निखिल मेश्राम यांनी केली.