Tuesday, July 1, 2025
महाराष्ट्र

मतिमंद विद्यार्थ्यांसोबत योग दिन उत्साहात साजरा

सावरी – 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात *lभाऊसाहेब बोरा निवासी मतिमंद विद्यालय, सावरी  येथे साजरा करण्यात आला. योगेश्वर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विशेष मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने झाली. योग प्रशिक्षक श्री.अर्जुन पटले सर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत सांगितले की, “योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून, तो मनाची शांती आणि आत्मिक बळ निर्माण करणारे प्रभावी साधन आहे. विशेष मुलांसाठी योग हे एक प्रभावी मार्गदर्शन ठरू शकते.”

विद्यार्थ्यांनी ताडासन, भुजंगासन, वज्रासन, त्रिकोणासन व प्राणायाम यांसारखी विविध योगासने मार्गदर्शनाखाली सादर केली. शिक्षक व सेवकवर्गानेही सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबत एकात्मतेचा संदेश दिला.

कार्यक्रमात संस्थेचे सचिव श्री. प्रशांत शहारे, कोषाध्यक्ष श्री. भारत शहारे, तसेच मुख्याध्यापिका सौ. वैशाली वैद्य मॅडम यांनी सर्व सहभागींचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासवृद्धीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमात श्री. महेश ठवरे, अरविंद मेश्राम, काजल रंगारी, शिल्पा हेमने, सायली वैद्य, अमित जांभूळकर यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता. उपस्थित सर्वांनी नियमित योगाभ्यासाचा संकल्प घेतला.

“योग केल्याने मिळते मनःशांती, आरोग्य आणि आत्मिक आनंद – हेच या कार्यक्रमाने पुन्हा एकदा अधोरेखित केले.”

error: Content is protected !!