Saturday, August 23, 2025
सड़क अर्जुनीक्राइम

रेती चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर डूगिप्पार पोलिसांची कार्यवाही

सडक अर्जुनी – दिनांक 26/06/2025 रोजी सायंकाळी 17.30 वा. सुमारास गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असता खोडसीवनी शेतसिवारातील चुलबंद नदी रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या 01 ट्रॅक्टरला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले व आरोपी चालक/मालक नामे राजेंद्र भानुजी परशुरामकर वय 53 वर्ष रा. खोडसीवनी यांचे ट्रॅक्टर क्र.MH 35 AG 8886 किं. 6,60,000/-रु. व त्यामध्ये एक ब्रास रेती किं.5000/-रु. असा एकुण 6,65,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कलम 303(2), 305 (E) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.नित्यानंद झा सा. अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, पोहवा आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने, पोशि शैलेश झाडे, श्रीकांत मेश्राम, चपोहवा संदीप इंगळे यांनी केली.

error: Content is protected !!