Thursday, July 3, 2025
सड़क अर्जुनी

डूग्गीपार पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न

सडक अर्जुनी – ( डॉ.सुशील लाडे) – डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे आज दिनांक ३ जुलै रोजी शांतता कमिटी ची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शांतता कमिटी चे सदस्य उपस्थित होते. डूग्गीपार पोलिस स्टेशन चे नवनियुक्त ठाणेदार गणेश वणारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही बैठक संपन्न झाली.

ठाणेदार यांचे शांतता कमिटी च्या वतीने पुष्पगुच देहून स्वागत करण्यात आले. तसेच पत्रकार बंधूंनी देखील ठाणेदार यांचे स्वागत केले.

ठाणेदार गणेश वणारे यांनी येणारे सन त्योहार यांवर विशेष चर्चा केली. त्याचप्रमाणे पत्रकारांनी तालुक्यातील विविध समस्या यावर चर्चा केली यामध्ये सडक अर्जुनी येथील दुर्गा चौक मुख्य चौक आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते आता शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आवागमन करीत असतात.

त्यामुळे भविष्यात अपघात किंवा धोका निर्माण होण्यातही दाट दाट शक्यता असल्यामुळे दुर्गा चौक शेंडा रोड वर पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात यावे अशी विनंती केली. तसेच शहरांत चोरी, अवैध धंदे, यावर अंकुश ठेवून  उपाय योजना करण्यात यावी असे विविध जनहित विषयाला घेऊन चर्चा पत्रकारांनी केली. 

” वाहतुकीला कोंडी निर्माण होऊ नये म्हणून दोन ट्रॅफिक पोलिस कर्मचारी दुर्गा चौक शेंडा रोड वर शाळेच्या वेळेस नियुक्त करण्यात येतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षा सोइ चे होईल.” 

ठाणेदार गणेश वणारे

error: Content is protected !!