Wednesday, July 16, 2025
क्राइमसड़क अर्जुनी

डुग्गीपार पोलीसांची रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरवर कारवाई  

सडक अर्जुनी – दिनांक 13/07/2025 रोजी सायंकाळी 18/00 वा. सुमारास पोलीस स्टेशन डुग्गीपार कार्यक्षेत्रातील मौजा कोहळीटोला/आदर्श ते सालईटोला डांबरी रोडाने उमरझरी नाला रेती घाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय बातमी मिळताच पोलीस स्टाफसह सदर ठिकाणी रेड कारवाई करून रेती चोरी करून वाहतुक करतांनी मिळून आलेल्या ट्रॅक्टर टॉली ला ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला आणण्यात आले .

आरोपी चालक/मालक नामे मयुर राजकुमार राऊत वय 32 वर्षे रा.गोपालटोली/डव्वा यांचे विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरट्रॉली किं.5,60,000/-रु. व त्यामध्ये एक ब्रास रेती किं.5000/-रु. असा एकुण 5,65,000/-रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध कलम 303(2), 305(ई) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.गोरख भामरे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री.विवेक पाटील सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार श्री.गणेश वनारे पो.स्टे. डुग्गीपार, पोहवा आशिष अग्निहोत्री, पोना महेंद्र सोनवाने यांनी केली.

error: Content is protected !!