Thursday, December 11, 2025
क्राइमसड़क अर्जुनी

सडक अर्जुनी तालुक्यात (POCSO Act) अंतर्गत शिक्षकावर गुन्हा दाखल

सडक अर्जुनी : शिक्षक सारखा पवित्र पेशाला काळीमा फासणारी घटना सडक अर्जुनी तालुक्यात उघडकीस आली.  सडक-अर्जुनी तालुक्यामधील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळा कोहळीटोला असून ती (आदर्श शिक्षण संस्था सावरी (ज.न.) ता. जिल्हा भंडारा ( अल्पसंख्यांक) द्वारे संचालित असलेल्या या खासगी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

पोलिस विभागाने दिलेल्या माहिती नुसार संबंधित शिक्षकावर विविध प्रकारच्या कायद्या द्वारे गुन्हा नोंद करण्यात आला. भारतीय न्याय संहिता ६४(२), ६५(२), ७५(२),१८१(१),  बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) ४,६,१२, आणि ७५ जेजे ऍक्ट, अंतर्गत डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून पोलिस कोठडीनंतर २१ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

शामराव रामाजी देशमुख (५३, रा. कोहमारा) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. तो सन २०२३ पासून २०२५ या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील वर्तन करीत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन क्रमांक १०९८ या हेल्पलाइनवर करण्यात आली. तक्रारीनंतर बाल न्यायालयमंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यात संबंधित शिक्षकाने विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याचे स्पष्ट झाले.

Oplus_0

चौकशी अहवालाच्या आधारे शुक्रवारी (दि. १८)डुग्गीपार पोलिस ठाण्यात (POCSO Act) पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली होती. आरोपीला सोमवारी (दि. २१) न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सोमवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.


“संबंधित शिक्षकावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आणखी तपास सुरू आहे.”

गणेश वणारे – ठाणेदार डूग्गीपार पोलिस स्टेशन

error: Content is protected !!