Sunday, August 3, 2025
क्राइमगोंदिया

स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया ची उत्कृष्ट कारवाई , एकास २ घातक अग्निशस्त्र व १० जिवंत काडतूसह अटक

गोंदिया – दिनांक २७/०७/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया येथील पोलीस पथक हे पेट्रोलिंग करित असतांना गोपनीय बातमी दाराकडुन खात्रीशिर बातमी मिळाली की, एक इसम मोटार सायकल ने गोंदिया कडून बालाघाट कडे अवैध अग्नीशस्त्र विक्री करिता घेऊन जाणार आहे.

अशा मुखबीर च्या खबरे वरुन पोलीस स्टेशन रावणवाडी परिसरात मुरपार गावाजवळ गोंदिया ते बालाघाट रोडवर आर टी ओ बॅरेल जवळ स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस पथकांनी २०.०० वा. दरम्यान नाकाबंदी लावण्यात आली असता अंदाजे २०. ३० वाजता दरम्यान एक इसम संशईतरित्या मोटार सायकलने आपले पाठीमागे काळ्या रंगाची बेग लटकवून गोंदिया कडून येतानी दिसला. सदर इसमास थांबवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारण्यात आले असता त्याने आपले नाव- प्रशांत केशव सोनवणे वय १८ वर्ष ०२ महीने रा. बारों ता. कोपरगाव जि. अहमदनगर असे सांगीतले. पंचासमक्ष सदर इसमाचे जवळ असलेल्या काळया रंगाचे बॅगची तपासणी करण्यात आली असता सदर बॅग मध्ये दोन गावठी लोखंडी पिस्टल (घातक अनीशस्त्रे) तसेच १० नग जीवंत काडतुस मिळून आले. 
जप्त करण्यात आलेले मालाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे .

१) एक गावठी लोखंडी पिस्टल जिया बेरेल ची लांबी १६ सेमी व मूठ एकूण लांबी १० सेमी एक लोखंडी ट्रिगर व एक लोखंडी मॅगजीन अंदाजे किंमती ५०,०००/
२) एक गावठी लोखंडी पिस्टल जिचा बरेल ची लांबी १५ सेमी व मुठ ची एकूण लांबी ८.५ सेमी असुन ज्याला एक लोखंडी ट्रिगर व एक लोखंडी मॅगजीन अंदाजे किंमती ५०,०००/
३) १० नग पिवळया धातुये जिवंत काळतुस अंदाजे किमती- ५०००/- रु

सदर इसमाविरुद्ध पोलीस स्टेशन रावणवाडी येथे अप क्रमांक ३८२ /२०२५ भारतीय हत्यार कायदा चे कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई तपास प्रक्रिया पोलीस स्टेशन रावणवाडी करीत आहेत.

सदरची कामगीरी श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे पोलीस निरीक्षक श्री पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शना खाली पो.हवा . राजेन्द्र चंदनप्रसाद मिश्रा, पो. हवा. महेश मेहर, पोहवा संजय चौहान, पोहवा सोमेन्द्रसिंह तुरकर , पोशि छगन विठठले, पो.शि. राकेश इंदुरकर, पो.शि. योगेश रहिले, चापोहवा लक्ष्मण बंजार यांनी केली आहे.

error: Content is protected !!