Saturday, August 2, 2025
सड़क अर्जुनी

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या, डव्वा द्वारे अनुसूचित जमाती कल्याण समितीला निवेदन 

सडक अर्जुनी – ( डॉ.सुशील लाडे) – महाराष्ट्र विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समिती दि.29 ते 31 जुलै 2025 या कालावधीत गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.

आज 30 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या तालुकानिहाय आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा/वसतिगृह तसेच शासनाच्या व जिल्हा परिषद यंत्रणाकडून आदिवासी उपयोजना क्षेत्रात राबविण्यात आलेल्या योजनांबाबत केलेल्या कामांना भेटी देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

त्याचप्रमाणे सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा ग्राम येथे अनुसूचित जमाती कल्याण समिती चा ताफा आले असता डव्वा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या, डव्वा (रजी. क्रमांक 1334) चे अध्यक्ष मधुकर गावराने आणि सदस्य यांनी संस्थेला येणाऱ्या विविध अडचणी बाबत निवेदन समिती ला सादर केले.

दिलेल्या निवेदनात मध्ये खालील अडचणी मांडल्या आहेत. त्यात 

१) संस्थेला सन २०१८-२०१९ पासून खरेदीवर मिळणारा कमिशन अजून पर्यंत मिळाला नाही.

२) संस्थेला सन २०२२-२०२३ पासून लेबर मंडी चार्ज मिळालेला नाही.

३) संस्थेच्या वतीने किरायाच्या गोदाम मध्ये धान खरेदी होत असून त्याचे भाडे शासनाकडून देण्याची तरतूत असून सुद्धा अजून पर्यंत प्राप्त झालेला नाही.

४) संस्था ही आदिवासी विकास सहकारी महामंडळ मर्या नाशिक ची उपभीकर्ता असून केंद्रशासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान्य खरेदी कृत असते परंतु खरेदी केलेल्या धान्याची उचल करण्याची जवाबदारी ही महामंडळाची असून दोन महिन्याच्या आत मालाची उचल करण्याची तरतूत शासन निर्णयात असून सुद्धा मुदतीत मालाची उचल न झाल्याने येणाऱ्या घटी तुटीस फक्त संस्थेला जवाबदार धरून वसुलीची कार्यवाही करण्यात येते ही योग्य बाब नाही यावर योग्य ती कार्यवाही व्हावी

५) रबी हंगाम २०२४-२०२५ मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आलेल्या धान्याचे चुकारे अजून पर्यंत देण्यात आलेले नाही त्या बरोबर मार्केटिंग फेडरेशन मार्फत खरेदी केलेल्या धान्याचे चुकारे आहेत व संस्थांचे चुकारे आलेले नाही ही गंभीर बाब असून यावर योग्य ती कार्यवाही व्हावी.

वरील प्रमाणे संस्थांच्या प्रमुख अडचणी असून यावर योग्य तो विचार विनिमय व्हावा व संस्थेच्या अडी अडचणी चे निराकरण करण्यात यावे म्हणून  अध्यक्ष अनु. जमाती कल्याण समिती यांना संस्थेचे अध्यक्ष मधुकरजी गावराणे व उपाध्यक्ष श्री. देवलालजी कटरे सचिव मनीष सोनवाणे , जी. प .सदस्य डॉ. भुवनेश्वर पटले, चेतन वाळगाये सभापती पंचायत समिती सडक अर्जुनी , माजी. उपसभापती शालिंदर कापगते, तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

error: Content is protected !!